AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवड्या डोंगरावरुन उडी मारणाऱ्या कुणालबद्दल पोलिस तपासात चक्रावणारी माहिती, थेट..

छत्रपती संभाजीनगर येथील घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. कुणाल याने खवड्या डोंगरावरुन उडी घेतली. त्याच्यासोबतच त्याच्या आई वडिलांनीही उडी घेतली. याबाबत आता पोलिसांनी मोठा खुलासा केला.

खवड्या डोंगरावरुन उडी मारणाऱ्या कुणालबद्दल पोलिस तपासात चक्रावणारी माहिती, थेट..
Kunal Chandgude
| Updated on: Aug 22, 2026 | 3:36 PM
Share

एका आयफोनच्या नादात अख्य्या कुटुंबाची राखरांगोळी झाली. मुलाचा आयफोनचा हट्ट. बापाने ऐपत नसतानाही लेकाला आयफोन घेऊन दिला. मात्र, त्यानंतरही मुलाने टोकाचे पाऊल उचलले. मुलाला वाचवण्यासाठी अनेक विनवण्या करूनही आई वडिलांना यश आले नाही. आपल्या लेकासाठी नवऱ्यालाही सोडायला आई तयार होती. तुझा आणि त्यांचा (वडिलांचा) वाद आहे ना… बाळा आपण दोघे वेगळे राहू, अशा विनवण्या आई करत होती. 3 तास हे सर्व सुरू होते. उपस्थित लोकही मुलाला समजावत होते. पण तो कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष त्याला डॉक्टर बनवण्यासाठी वडील काबाड कष्ट करत होते. दहावीत कुणालला 92 टक्के गुण मिळाले. मात्र, एक वाद आणि कुणालने टोकाचे पाऊल उचलले. कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष, वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 वर्ष आणि आई संगीता चांदगुडे ठार झाले.

कुणाल खवड्या डोंगरावरुन उडी खात होता. उपस्थितांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकला नाही. मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी धाव घेतली. कुणालला त्यांनी पकडले देखील पण दोघेही डोंगराहून खाली पडले. नवऱ्याला आणि मुलाला खाली पडताना पाहून आईनेही उडी घेतली. या घटनेने मोठी खळबळ उडाली. त्यातच आता पोलिसांनी या प्रकरणात मोठी माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर येथील घटनेची देशभरात चर्चा होतंय.

पोलिसांनी म्हटले की, प्राथमिक तपासानुसार, वडील आणि मुलामध्ये वाद झाला होता. तो वाद कशावरून झाला होता? काय बोलले होते? त्याच्या मनात काय सुरू होते? या प्रश्नांची कदाचित उत्तरे मिळणार नाहीत. कारण याबाबतही माहिती सांगणारे आई वडील, मुलगा कोणीही राहिले नाही.

मात्र, आयफोन कारण नाही, ती फक्त चर्चा असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात म्हटले. कारण मुलाकडे अगोदरच आयफोन होता. त्याच्या हप्त्यावरून वाद झाल्याचेही सांगितले जातंय. प्राथमिक तपासात आयफोन कारण नसल्याचे दिसतंय. कुणाल याला वाचवण्याचा प्रयत्न झाला. यादरम्यान कोणीतरीह त्याला आयफोन 15 देतो, असेही म्हले होते.

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती