AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khawdya Dongar: कुणालची फक्त एकच मागणी होती, पण मुरलीकाका… अखेर बहिणीने बोलून दाखवलं माहित नसलेले सत्य

Kunal Chandugade Khawdya Dongar Case: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरुन चांदगुडे कुटुंबाने उडी मारुन आपलं आयुष्य संवपलं. .  आता कुणालच्या बहिणीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Khawdya Dongar: कुणालची फक्त एकच मागणी होती, पण मुरलीकाका... अखेर बहिणीने बोलून दाखवलं माहित नसलेले सत्य
| Updated on: Aug 27, 2026 | 11:28 AM
Share
Khawdya Dongar Case: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरुन चांदगुडे कुटुंबाने उडी मारुन आपलं आयुष्य संवपलं. या घटनेने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. या घटनेनंतर अनेक गोष्टी रोज समोर येत आहे. सुरुवातीला आयफोनच्या हट्टापायी कुणालने उड्डी मारली असं समोर आले होते, पण आता असं समजत आहे की चांदगुडे कुटुंबात अनेक वाद होते. या वादामुळेच कुणाल तणावात होता आणि त्याने हे पाऊल उचलले.  आता कुणालच्या बहिणीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रक्षाबंधन जवळ आलंय… पण यंदा माझा भाऊ कुणालच माझ्यासोबत नाही. ही वेदना शब्दांत सांगण अत्यंत कठीण आहे, अशा अत्यंत भावुक शब्दांत कुणालच्या मावस बहिणीने तिची वेदना मांडली. खवड्या डोंगर घटनेनंतर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये कुणाल, मावसी संगीता आणि मुरली काका यांच्याबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. आता यावर तिने आपला संतापही व्यक्त केला.  कुणालच्या बहिणीने स्पष्ट केले की, कुणालने पैशांसाठी किंवा आयफोनसाठी हे पाऊल उचलले हे साफ खोटे आहे.. त्याच्याकडे आयफोन 15 प्रो होता आणि आई-वडिलांनी त्याला लहानपणापासून कसलीही कमी भासू दिली नव्हती.  मावस बहिण म्हणाली की, “त्याला फक्त त्याचे वडिल हवे होते”
 बहीण म्हणाली की, त्याला कोणतीही संपत्ती नको होती,  त्याला फक्त त्याचे वडील हवे होते. गेल्या 20 वर्षांत ज्या आत्याने कधीच विचारपूस केली नव्हती, ती आत्या अचानक जवळ आल्याने ती आता मुरली काकांना कुटुंबापासून दूर नेणार अशी भीती कुणालला आणि मावशीला होती. मुरली काकांचा स्वभाव अत्यंत निर्मळ असल्याने त्यांच्याशी कोणीही गोड बोलले की ते लगेचच भाळायचे. याच गोष्टीचा फायदा उठवून वडिलांना आपल्यापासून दूर नेतील अशी भीती कुणालला सारखी सतवायची. आम्ही आमचा भाऊ, मावशी आणि काका यांना एकाचवेळी गमावले आहे, हे दुःख असह्य आहे. अशा वेळी ज्या गोष्टी त्यांनी कधी केल्याच नाहीत, त्या गोष्टींचा संबंध जोडून मृत व्यक्तींची बदनामी करू नका, असे आवाहन कुटुंबाने केले आहे.

Follow Us
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही