Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 4500 कधी मिळणार? शेवटी तारीख आलीच, या दिवशी बँक खातं होणार फुल!

Ladki Bahin Yojana : पटापट खर्चाची यादी तयार करा! लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेला लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 4500 कधी मिळणार? शेवटी तारीख आलीच, या दिवशी बँक खातं होणार फुल!
Ladki Bahin Yojna
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 04, 2026 | 4:04 PM

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते थकले होते. यामुळे अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली होती, काही ठिकाणी आंदोलनेही झाली होती. आता हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळणार 4500 रुपये

महिला व बालविकास विभागाने या समस्येची दखल घेतली असून, ई-केवायसी पूर्ण न झालेल्या किंवा त्रुटी असलेल्या अर्जांची फेरपडताळणी सुरू केली आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा थकित हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एकदम ४,५०० रुपये (१,५०० × ३) जमा होणार आहेत. अर्जांची छाननी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच फेब्रुवारी महिन्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल

-ज्या महिलांना यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळालेले नाहीत, त्यांना तीन महिन्यांचे एकत्रित ४,५०० रुपये मिळतील.

-ज्या महिलांना आधीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत, त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता दिला जाईल.

कुठे चेक करावे?

ही माहिती महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या अपडेटनुसार आहे. ई-केवायसी आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच हे पैसे जमा होतील. योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (ladakibahin.maharashtra.gov.in) स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली होती आणि त्याचा मोठा राजकीय फायदा महायुती सरकारला मिळाल्याचे दिसून आले. सध्या लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांना या महिन्यात एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे.