Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट? योजनेबाबत मोठी बातमी, मिळणार इतके पैसे…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. आता या योजनेबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट? योजनेबाबत मोठी बातमी, मिळणार इतके पैसे...
Ladki Bahin Yojana
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 10, 2026 | 3:27 PM

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती,  या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वार वाहत आहे, आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांची आचारसंहिता आणि त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता यामुळे या योजनेतील पैशांना ब्रेक लागला होता, तरी देखील सरकारने मध्यंतरी नोव्हेंबरचा हाफ्ता लाभार्थी महिलांना वितरीत केला, मात्र डिसेंबर आणि जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार याकडे आता लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार  आता या योजनेतील लाभार्थी महिलांची सक्रांत गोड होणार आहे.  येत्या चार ते पाच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी अशा दोनही महिन्याचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 14 किंवा 15 जानेवारी रोजी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे. मात्र या माहितीला अद्याप सरकारकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये.

विरोधकांकडून आक्षेप 

दरम्यान लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हाफ्ता मकर सक्रांतीपूर्वी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचं मतदान असल्यानं या पार्श्वभूमीवर विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे, जर लाभार्थी महिलांना निधीचं वितरण झालं तर हा आचारसंहितेचा भंग होईल असं विरोधकांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता लाभार्थी महिलांना मकरसंक्रांतीपूर्वी पैसे मिळणार की? निवडणुका झाल्यावर पैसे बँक खात्यात जमा होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.