Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी; लाभार्थी महिलांची ती इच्छा अखेर पूर्ण, आदिती तटकरेंची मोठी घोषणा

लाडक्या बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी आहे, गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती, अखेर तो निर्णय आता घेण्यात आला आहे. योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी; लाभार्थी महिलांची ती इच्छा अखेर पूर्ण, आदिती तटकरेंची मोठी घोषणा
ladki bahin yojan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 01, 2026 | 4:28 PM

राज्यातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या अनेक नेत्यांकडून असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं, की जर आमचं सरकार आलं तर आम्ही या योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, लाडक्या बहिनींना दर महिन्याला 2100 रुपये देऊ. मात्र आता राज्यात नवं सरकार सत्तेत येऊन दीड वर्ष झालं आहे, मात्र सन्मान नीधीच्या वाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.  तर दुसरीकडे या योजनेतून अनेक महिलांची नावं देखील वगळण्यात आली आहे.

दरम्यान आता या योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या योजनेसाठी पात्र नसताना देखील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निर्दर्शनास आलं होतं, त्यानंतर सरकारने अशा महिलांची नाव या योजनेतून वगळण्यासाठी   केवायसी बंधनकारक केली होती. या केवायसीसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी केली नाही, त्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली आहेत.

मात्र अशा देखील काही महिला होत्या ज्यांनी केवायसी करून देखील तसेच त्या या योजनेसाठी पात्र असताना देखील त्यांची नाव या योजनेतून वगळण्यात आली होती, कारण त्यांच्या केवायसीमध्ये काही तांत्रिक चुका झाल्या होत्या, दरम्यान त्यानंतर या तांत्रिक चुका दुरूस्त करण्यासाठी राज्य सरकारने लाभार्थी महिलांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.  31 मार्चपर्यंत या चुका दुरूस्त करून घ्याव्यात, असं आव्हान सरकारने केलं होतं. दरम्यान केवायसीला मुदत वाढ मिळावी अशी इच्छा अनेक लाभार्थी महिलांच्या मनात होती. अखेर ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. लाभार्थी महिलांना आता केवायसी करण्यासाठी 31 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत मत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे.

Follow Us