AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Alert : रेड अलर्टचा इशारा खरा ठरला, मध्यरात्रीपासूनच मुंबई-ठाणे- नवी मुंबईत जोरदार पाऊस, राज्यात दाणादाण

कल्याण-डोंबिवलीत रेड अलर्टनुसार मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे आंबेडकर रोडसह सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना अडचणी येत आहेत. ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे परिसरातही जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज आहे. सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Alert : रेड अलर्टचा इशारा खरा ठरला, मध्यरात्रीपासूनच मुंबई-ठाणे- नवी मुंबईत जोरदार पाऊस, राज्यात दाणादाण
हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
| Updated on: Jul 04, 2026 | 8:34 AM
Share

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे राज्यातील नागरिक सुखावले आहेत. गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज, शनिवारीही कायम आहे. अख्खा जून महीना कोरडा गेल्यानंतर, अखेर पावसाने दर्शन दिल्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. दरम्यान राज्यभरासह आता मुंबईतीह पावसाचा जोर वाढला असून त्याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला होता. हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली . रेड अलर्टचा तो इशारा खरा ठरला असून मध्यरात्रीपासून कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. आंबेडकर रोड पाण्याखाली गेल्याचेही दिसून आले. पावसामुळे मुंबईतील तसेच उपनगरांमधील अनेक भागात पाणी साचल्याचं गेल्या दोन तीन दिवसांपासून दिसत होतं. शनिवारीही पावसाचा जोर कायम राहीलं असंच चित्र दिसतंय.

रेड अलर्टचा इशारा ठरला खरा

कल्याण-डोंबिवली परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विरत कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा आला असून अनेक नागरिकांनी पावसाचा आनंद लुटला. मात्र अविरत पावसामुळे सखल भागांसह अनेक रस्त्यांच्या कडेला पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आंबेडकर रोड पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत वाहनचालकांना वाहने चालवावी लागत असून वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले. हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.शाऱ्यानंतर महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून, जिल्ह्याती शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर पावसाने मुंबईत विश्रांती घेतली. मुंबई उपनगरात पाऊसाची संततधार थांबली होती. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत सुरू होती, लोकल ट्रेन या 5 ते 10 मिनिटे उशीराने धावत आहेत. मात्र हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर काही ठिकाणी पुन्हा पावसाला सुरूवात झाली असून वरूणराजाचा जोर वाढण्याची शक्यत आहे.

पुण्याचा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी

गेल्या तीन-चार दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या सरींनी शुक्रवारी चांगला जोर धरला. सकाळपासूनच पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले असून रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. पुढील तीन ते चार दिवस शहरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ