AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! कर्जमाफीसंदर्भात मोठा दिलासा… अजून एक धडाकेबाज निर्णय, सरकारला उशीरा सुचलं शहाणपण

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमाफी योजनेत सरकारने उशीरा का होईना एक चांगले पाऊल टाकले आहे. या धडाकेबाज निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थात हा निर्णय दोन ते तीन महिन्यांपूर्वी घेतला असता अजून मोठा फायदा झाला असता.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! कर्जमाफीसंदर्भात मोठा दिलासा... अजून एक धडाकेबाज निर्णय, सरकारला उशीरा सुचलं शहाणपण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 04, 2026 | 8:32 AM
Share

Farmer Loan Waiver Scheme 2026 No Interest on Loan : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेविषयी धडाकेबाज निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय अगोदरच घेणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहे. उद्यापासून 5 जुलैपासून कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेला सुरूवात होत आहे. तर जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात सरकारकडून कर्जमाफीची रक्कम जमा होईल. त्यांची खाती निरंक होतील. त्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना आनंदवार्ता दिली आहे.

थकीत कर्जावर व्याज आकारणीस मज्जाव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला. लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जोपर्यंत लाभाची रक्कम जम होत नाही, तोपर्यंत थकीत पीककर्ज रक्कमेवर व्याज आकारणीस सरकारने मज्जाव केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी कोणतीही व्याज आकारणी करू नये, सरकारने बजावले आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने याविषयीचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शेतकरी कर्जमाफी योजनेत अल्पमुदतीचे पीककर्ज, पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित पीककर्जाचा समावेश करण्यात आला आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार, 30 जून 2025 रोजी थकीत आणि 31 मार्च 2026 रोजीपर्यंत परतफेड न झालेल्या पीककर्जांचा यामध्ये समावेश आहे.

राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे दोन लाखांचे कर्ज माफ करण्याचे धोरण ठरवले आहे.

दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता(OTS)

50 हजारांचा प्रोत्साहनपर लाभ (नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान)

5 जुलैपासून योजनेच्या प्रक्रियेला गती

सरकारने 30 जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा हवेत विरली. 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळेल असे अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार उद्यापासून कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेला गती येईल. तर प्रत्यक्ष लाभ मिळण्यास जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उजडेल.

शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्याचे काम वेगात

कर्जखात्यांची पडताळणीचे कामही वेगात सुरू आहे

शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे

त्यानंतर कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येईल

तोपर्यंत थकीत पीककर्ज रक्कमेवर व्याज आकारणीस बंदी

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना फायदा

जवळपास 36 हजार 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत

Follow Us
मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंचा नेता...
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट...
सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
Suresh Dhas | सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या...
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या वरिष्ठांना भेटणार, कारण...
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का?
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत...
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन