AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत नाव हुडकायचं कसं? जाणून घ्या एका क्लिकवर, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: पुढील आठवड्यात कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. पण तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तपासणार कसे? जाणून घ्या एका क्लिकवर

Farmer Loan Waiver: कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत नाव हुडकायचं कसं? जाणून घ्या एका क्लिकवर, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 02, 2026 | 9:53 AM
Share

Loan Waiver Beneficiary List: गेल्या 12 वर्षातील तिसरी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. 2014 मध्ये फडणवीस सरकारने कर्जमाफी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने 2019 मध्ये कर्जमुक्ती योजना राबवली. तर आता फडणवीस सरकाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनेचा मुहूर्त हुकला आहे. 5 जुलैनंतर योजना राबवण्यात येणार आहे. तर प्रत्यक्ष लाभ मिळण्यास जुलैचा दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. या योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे तपासणार कसे?

तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही?

सरकारने कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. योजनेच्या अंमलबाजवणीसाठी सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांचा डेटा विशेष पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना यादीत स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच ऑनलाईन पोर्टलवर यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायक, तलाठी सज्जा, बँका, विविध सहकारी विकास संस्था, कार्यकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र आणि ऑनलाईन पोर्टलवर पाहता येतील. या ठिकाणी या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शेकऱ्यांना त्यांच्या नावाची पडताळणी करता येईल. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही मॅसेज येईल. जर तुमचे नाव यादीत नसेल अथवा काही तांत्रिक अडचण असेल तर शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र यंत्रणाही मदत करेल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 मध्ये

संपूर्ण कर्जमाफी (2 लाखांपर्यंतची कर्जमुक्ती)

प्रोत्साहनपर लाभ (नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान)

दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता(OTS)

अशी लाभार्थी शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या योजनेत 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 500 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून ही योजना राबवली जाईल. महाआयटीच्या माध्यमातून पूर्णपणे डिजिटल स्वरुपात ही योजना राबवण्यात येणार आहे.

कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची नाही गरज

कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. आधार क्रमांक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सहकारी बँका, व्यापारी बँकांना शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अपडेट करण्याची सूचना सहकार आयुक्त आणि निबंधकांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांनाही त्यांचे आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.

Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया