AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा खोका इथे कुणी ठेवला, आदित्य ठाकरे ओरडले… अन् पत्रकार…

पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी खोक्यावरून मिश्किल टिप्पणी केल्याचं पहायला मिळालं. मात्र तिथे उपस्थित असलेल्या पत्रकाराने देखील तेवढ्याच हजरजबाबी पद्धतीने त्यांना उत्तर दिलं.

हा खोका इथे कुणी ठेवला, आदित्य ठाकरे ओरडले... अन्  पत्रकार...
Aditya ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 21, 2026 | 10:26 AM
Share

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या शिवसेनेतील उठावानंतर तत्कालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, तेव्हापासून शिवसेना ठाकरे गटाकडून महायुती सरकारचा उल्लेख खोके सरकार असा करण्यात येतो. अनेकदा भर सभेत आणि पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना शिंदे गटावर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका करण्यात येते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर त्यांना शिवसेनेतील अनेक आमदारांनी पाठिंबा दिला होता, या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यांनी पन्नास -पन्नास खोके घेतल्याचा आरोप देखील शिवसेना ठाकरे गटाकडून अनेकदा करण्यात आला आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला. शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यांच्यावर देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने असेच आरोप झाले, जोरदार टिका झाली. खोका हा शब्द सध्या राजकारणात चांगलाच चर्चेत आहे.

दरम्यान याच शब्दावरून आता आदित्य ठाकरे यांनी मिश्लिक टिप्पणी केल्याचं पहायला मिळत आहे. एका पत्रकार परिषदेमधील हा प्रसंग आहे. आदित्य ठाकरे यांना बोलण्यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचे माईक एका खोक्यावर ठेवण्यात आले होते. हे दृष्ट पाहून आदित्य ठाकरे यांनी हा खोका इकडे कोणी ठेवलारे? अशी मिश्लिक टिप्पणी केली, त्यावर लगेच पत्रकारांनी देखील हजरजबाबी उत्तर दिलं तो खोका खाली आहे, असं पत्रकारराने म्हटलं. पत्रकाराचं उत्तर ऐकून उपस्थित सर्वच हसायला लागले.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सातत्याने शिवसेना शिंदे गटावर टीका करण्यात येते, राज्यात जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार होतं, तेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सातत्याने हे खोके सरकार असल्याची टीका सुरू होती, त्यावर आता पुन्हा आदित्य ठाकरे यांनी मिश्कील टप्पणी केल्याचं पहायला मिळत आहे.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा