
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकार दीड हजार रुपये जमा करतं. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. दरम्यान त्यानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी इ केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. इ केवायीसची मुदत संपल्यानंतर देखील अनेक महिलांनी केवायसी न केल्यामुळे आता त्यांचा हाप्ता बंद करण्यात आला आहे, तर दुसरीकडे काही महिलांनी केवायसी केली, मात्र त्यामध्ये काही चुका झाल्यामुळे त्यांचा देखील हाप्ता बंद करण्यात आला आहे, आता ज्या महिलांनी केवायसी केली, मात्र काही चुका झाल्यानं त्यांचा हाप्ता बंद झाला आहे, अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
या योजनेसाठी पात्र असलेल्या ज्या लाभार्थी महिलांनी केवायसी केली आहे, मात्र त्यामध्ये काही चुका झाल्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले आहेत, अशा महिलांना आता पुन्हा एकदा आपल्या ई केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. 31 मार्च 2026 पर्यंत लाभार्थी महिला ऑनलाईन पोर्टच्या माध्यमातून केवायसीमध्ये दुरुस्ती करू शकणार आहेत, याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!
e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप… pic.twitter.com/tggmXwgtOa
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 6, 2026
नेमकं काय म्हणाल्या तटकरे?
‘e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.’ असं तटके यांनी म्हटलं आहे.