Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले, लाभार्थी महिलांना झटका, मोठी बातमी

ज्या कुटुंबातील महिलांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेबाबत एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले, लाभार्थी महिलांना झटका, मोठी बातमी
Ladki Bahin Yojana
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 19, 2026 | 4:36 PM

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.  या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात. ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. दरम्यान आधी जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका तसेच त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकीची अचारसंहिता सुरू झाली. यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना विलंबाने मिळाले, नोव्हेंबरचा हाप्ता डिसेंबरमध्ये मिळाला तर डिसेंबरचा हाफ्ता जानेवारीमध्ये मिळाला, दरम्यान अद्याप जानेवारीचा हाप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये, जानेवारीचा हाफ्ता कधी मिळणार? याकडे सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं असतानाच आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे, त्यामुळे लाडक्या बहीणींची चिंता वाढली आहे.

महापालिकेची निवडणूक संपूनही लाडकी बहीण योजनेचा हाप्ता न मिळाल्यानं अमरावतीमध्ये लाभार्थी महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.  अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींनी भव्य मोर्चा काढला आहे. या मोर्चात शेकडो लाडक्या बहिणी सहभागी झाल्या आहेत. अचारसंहिता संपली, ई -केवायसी देखील केली मात्र अजूनही डिसेंबरचा हाप्ता न मिळाल्यानं महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. लाडक्या बहिणींनी आता आंदोलनालास सुरुवात केली आहे.

दरम्यान दुसरीकडे वाशिममध्ये देखील हीच स्थिती आहे.  वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणी देखील योजनेचे पैसे न मिळाल्यानं चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. इ केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा हाप्ता न मिळाल्यानं महिला आक्रमक झाल्या आहेत. आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. पैसे द्यायचे तर सर्वच बहिणींना द्या, नाही तर योजना बंद करा अशी मागणी यावेळी या महिलांनी केली आहे. त्यानंतर  जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांची समस्या समजून घेतली.  हिंगोलीमध्ये देखील लाडक्या बहिणी चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.  हिंगोली जिल्ह्यातील महिलांनी देखील पैसे मिळत नसल्यानं जिल्हाधीकारी कार्यालायात मोठी गर्दी केली होती.