Ladki Bahin Yojana : त्या लाडक्या बहिणींचे पैसे कायमचे बंद? नवीन अपडेट काय?

ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, आता या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : त्या लाडक्या बहिणींचे पैसे कायमचे बंद? नवीन अपडेट काय?
लाडकी बहीण योजना
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 26, 2025 | 6:55 PM

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं बोललं जातं. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं, राज्यात बहुमतानं सरकार आलं. दरम्यान आम्ही सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींच्या सन्माननिधीमध्ये वाढ करू असं अश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलं होतं, मात्र सरकार सत्तेत येऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे, मात्र अजूनही  2100 रुपयांबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही.

आता मोठी बातमी समोर येत आहे ती, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून केवायसी अनिर्वाय करण्यात आली आहे, ई केवायसीची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 आहे, मात्र अजूनही या योजनेच्या लाभार्थी असलेल्या अनेक महिलांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यामुळे जर मुदतीमध्ये केवायसी केली नाही, तर अशा महिलांना मिळणारा लाभ बंद होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पात्र नसलेल्या अनेक महिला सध्या या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत, त्यामुळे अशा महिलांना वगळण्यासाठीच सरकारने केवायीस अनिर्वाय केली आहे. 31 डिसेंबरपूर्वी जर केवायसी झाली नाही तर लाभ बंद होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

तर दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या योजनेसाठी असलेल्या केवासयीच्या अंतिम तारखेला आणखी एकदा मुदतवाढ मिळू शकते असा अंदाज देखील वर्तवला जात आहे, या आधी देखील एकदा मुदतवाढ मिळाली आहे.  मात्र मुदत वाढ मिळणार की नाही? याबाबत देखील अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी.