AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये? दिवाळी गोड होणार? महत्त्वाची माहिती समोर!

आता सप्टेंबर महिना संपलेला आहे. ऑक्टोबर महिन्याचा एक आठवडाही संपून गेलाय. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण आहे. त्यामुळे हा सण लक्षात घेऊन सरकार दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देणार का? असे विचारले जात आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये? दिवाळी गोड होणार? महत्त्वाची माहिती समोर!
ladki bahin yojana updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 3:24 PM
Share

Ladki Bahin Yojan Update : राज्य सरकारची माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारतर्फे पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून वितरीत करण्यास सुरुवात झाली होती. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी दिला जाणार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आता ऑक्टोबरचा महिना सुरू झाल्याने या महिन्याचाही हप्ता नेमका कधी मिळणार, असे लाडक्या बहिणी विचारत आहेत. असे असतानाच आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींना एकाच वेळी 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सप्टेंबर महिन्याचं काय झालं? ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी मिळणार?

सरकारने ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित केला होता. सप्टेंबर महिना संपलेला असला तरीही अजून या महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना अजूनही मिळालेले नाहीत. सप्टेंबर महिन्याच्या पैशांच्या वितरणासाठी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु दसऱ्यानंतर लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये दिले जाऊ शकतात. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत याबाबतचा जीआर न निघाल्यास सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार याबाबतही प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये मिळणार का?

दरम्यान, आता सप्टेंबर महिना संपलेला आहे. ऑक्टोबर महिन्याचा एक आठवडाही संपून गेलाय. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण आहे. त्यामुळे हा सण लक्षात घेऊन सरकार दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देणार का? असे विचारले जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत सप्टेंबर महिन्याच्या पैशांचा जीआर न आल्यास ही शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये पाठवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान राज्यात एक कोटी 66 लाख लाकड्या बहिणींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाऊ जातो.

Follow Us
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द