
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा गरीब घरातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. लाडकी बहीण ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. दरम्यान आता या योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे आता नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व पात्र महिला लाभार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे अचारसंहिता सुरू आहे.
त्यामुळे निवडणूक काळात महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे येणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन महिन्यांचे एकत्रच पैसे या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दोन महिन्याचे एकत्रीत तीन हजार रुपये या योजनेतील महिलांना मिळण्याची शक्यता आहे, परंतु हा केवळ अदांज व्यक्त करण्यात येत असून, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय प्रशासन स्थरावर झालेला नाहीये.
केवायसीला मुदतवाढ
दरम्यान ही योजना सुरू केली होती, तेव्हा या योजनेसाठी सरकारने काही अटी देखील घातल्या होत्या, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं असून, त्यासाठी आता या योजनेसाठी सरकारकडून केवायसी बंधनकारक करण्यात आलं आहे. सुरुवातील केवायसीसाठी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र अनेक लाभार्थ्यांची केवायसी बाकी असल्यानं आता केवायसी साठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता या योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. दरम्यान त्यानंतर ज्या महिलांची केवायसी पूर्ण होणार नाही, त्या महिलांचे पैसे बंद होण्याची शक्यात आहे.