सोमवारी काँग्रेसची धडक राजभवनावर, पटोलेंच्या नेतृत्वात मौनव्रत आंदोलन करणार

| Updated on: Oct 10, 2021 | 6:13 PM

"आमच्या दबावामुळे नाईलाजाने आशिष मिश्राला अटक करण्यात आली. आशिष मिश्राच्या वडिलांनी राजिनामा घ्यावा. त्यासाठी आम्ही उद्या (11 ऑक्टोबर) राजभवानासमोर आंदोलन करणार आहोत," अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

सोमवारी काँग्रेसची धडक राजभवनावर, पटोलेंच्या नेतृत्वात मौनव्रत आंदोलन करणार
AJAY MISHRA NANA PATOLE
Follow us on

मुंबई : लखीमपूर खेरी हिंसाचार आणि शेतकरी मृत्यू प्रकरणात देशभरातून केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातदेखील काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केलाय. आशिष मिश्रा यांचे वडील केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली आहे. या मागणीला घेऊन नाना पटोले यांच्या नेतृत्वात सोमवारी राजभवनावर मौनव्रत आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाविषयी “आमच्या दबावामुळे नाईलाजाने आशिष मिश्राला अटक करण्यात आली. आशिष मिश्राच्या वडिलांनी राजिनामा घ्यावा. त्यासाठी आम्ही उद्या (11 ऑक्टोबर) राजभवनासमोर आंदोलन करणार आहोत,” अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

आशिष मिश्राच्या वडिलांचा राजीनामा घ्यावा

“आमच्या नेत्यांनी पूर्ण देशभर विरोध केला आणि दबाव वाढवला. आमच्या दबावामुळे नाईलाजाने आशिष मिश्राला अटक करण्यात आली. मात्र त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होवू नयेत यासाठी प्रयत्न केला जातोय. आशिष मिश्राच्या वडिलांचा राजीनामा घ्यावा. उद्या आम्ही राजभवनाबाहेर आंदोलन करणार आहोत,” असे नाना पटोल म्हणाले आहेत.

आशिष मिश्रा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आलं आहे. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सध्या न्यायालयाने मिश्रा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना शनिवारी (9 ऑक्टोबर) सकाळी ताब्यात घेण्यात आलं होतं.

शनिवारी 12 तास चौकशी, पण सहकार्य केले नाही

शनिवारी त्यांची जवळपास 12 तास चौकशी करण्यात आली होती. मात्र, “अनेक तासांपासून सुरु असलेल्या चौकशीत आशिष मिश्राने सहकार्य केलं नाही. तो अनेक गोष्टी सांगू इच्छित नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे,” अशी माहिती डीआयजी उपेंद्र यादव दिली होती. पोलिसांनी आशिष मिश्रा यांच्याविरोधात खून, गुन्हेगारी कट, बेपर्वाईने ड्रायव्हिंग करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांना चिरडले, प्रियंका गांधींना रोखले, उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा; अशोक चव्हाण यांचं आवाहन

ओबीसी आरक्षण: औरंगाबादेत 12 ऑक्टोबरला भाजपतर्फे विभागीय मेळावा, जनजागृतीसाठी मोहीम

Maharashtra Bandh | पुण्यानंतर मुंबईतही महाराष्ट्र बंदला काही व्यापारी संघटनांचा विरोध, शेतकऱ्यांना मात्र पाठिंबा

(lakhimpur kheri violence ashish mishra arrested congress demands minister ajay mishra resignation maharashtra congress will protest in front of rajbhavan on monday)