शेतकऱ्यांना चिरडले, प्रियंका गांधींना रोखले, उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा; अशोक चव्हाण यांचं आवाहन

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. (everybody should participate in maharashtra bandh, says ashok chavan)

शेतकऱ्यांना चिरडले, प्रियंका गांधींना रोखले, उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी व्हा; अशोक चव्हाण यांचं आवाहन
ashok chavan
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 4:30 PM

नांदेड: उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आणि बळीराजाला भेटायला जाणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

अशोक चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आंदोलने होत आहे. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. परंतु, त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडले जाते. या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी लखीमपूर खेरीला जाणारे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी सारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना बळाचा वापर करून रोखले जाते, त्यांना अटक केली जाते. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. ही दडपशाही लोक सहन करणार नाहीत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. नागरिकांनी सुद्धा शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावे, असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.

पीक विम्यावर उद्या चर्चा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, ही अपेक्षा रास्त आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हानिहाय नुकसानीचा आढावा घेतला. नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या बैठकीत सहभागी झालो होतो. या नैसर्गिक संकटामुळे नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती बिकट झाली आहे. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीने 80 टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी मी कालच्या बैठकीत मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत उद्या या विषयावर मुंबईत चर्चा होईल. पीक विमा आणि शेतकऱ्यांना एसडीआरएफ, एनडीआरएफमधून मदत देण्याबाबत येत्या आठवड्यात निर्णय होणे अपेक्षित आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महाविकास आघाडीचा बंद

दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी काल सांगितलं होतं. तसंच अन्य मित्र पक्षांशीही बोलणं सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशात लखीमपूरला जी घटना घडली शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची. त्याचा निषेध 11 तारखेला केला जाणार आहे. आज मंत्रिमंडळातही याबाबत सर्वांनी खेद व्यक्त केलाय. तसंच मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष देशातील शेतकऱ्यांविरोधात ज्या क्रुरतेनं वागत आहे, देशात जागोजागी सुरु असलेली शेतकऱ्यांची आंदोलनं चिरडण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. त्याचा निषेध अत्यंत आवश्यक आहे. लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, अशी आमची माहिती आहे. त्यामुळे ज्या बेमुवर्तखोरपणे उत्तर प्रदेश सरकार आरोपींवर कारवाई करत नाही, त्याचाही निषेध झाला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

Breaking : लखीमपूर हिंचारासाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक, 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

घटस्फोटित पत्नीला मिठी मारुन बॉम्बने उडवलं, आत्मघाती हल्ल्यात नवऱ्याचाही मृत्यू

CM at Mumba Devi Temple | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनाला

(everybody should participate in maharashtra bandh, says ashok chavan)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.