AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आरक्षण: औरंगाबादेत 12 ऑक्टोबरला भाजपतर्फे विभागीय मेळावा, जनजागृतीसाठी मोहीम

औरंगाबाद : ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) सरकार अपयशी ठरले असून समाजात याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे, हे जनतेला पटून देण्यासाठी औरंगाबादमध्ये (Aurangabad) येत्या 12 ऑक्टोबर रोजी भाजप तर्फे विभागीय पातळीवर ओबीसी मेळावा घेतला जाणार आहे. रविवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत ओबीसी मोर्चाचे भवान घडामोडे यांनी यासंबंधी माहिती दिली. मंत्री संजय कुटेंसह देवेंद्र फडणीसांची उपस्थिती या […]

ओबीसी आरक्षण: औरंगाबादेत 12 ऑक्टोबरला भाजपतर्फे विभागीय मेळावा, जनजागृतीसाठी मोहीम
ओबीसी आरक्षणावरून औरंगाबादेत भाजप घेणार विभागीय मेळावा
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 5:13 PM
Share

औरंगाबाद : ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) सरकार अपयशी ठरले असून समाजात याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे, हे जनतेला पटून देण्यासाठी औरंगाबादमध्ये (Aurangabad) येत्या 12 ऑक्टोबर रोजी भाजप तर्फे विभागीय पातळीवर ओबीसी मेळावा घेतला जाणार आहे. रविवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत ओबीसी मोर्चाचे भवान घडामोडे यांनी यासंबंधी माहिती दिली.

मंत्री संजय कुटेंसह देवेंद्र फडणीसांची उपस्थिती

या मेळाव्यातून ओबीसी आरक्षणात सरकार कसे अपयशी ठरले यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यास माजी मंत्री संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार अतुल सावे, ओबीसी मोर्चाचे भगवान घडामोडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

श्रीहरि पॅव्हेलियन येथे मेळाव्याचे आयोजन

शहानुरमियाँ दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे सकाळी अकरा वाजता हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास मराठवाड्यातून ओबीसी समाजाचे पदाधिकारी समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात आरक्षण वाचवण्यात राज्य सरकार कशाप्रकारे अपयशी ठरले. याच्यावर चर्चा करण्यात येणार आहे. यासह सर्व पातळ्यांवर सरकार कशाप्रकारे अपयशी ठरत आहे याचीही चर्चा केली जाणार आहे.

ओबीसी समाजाचे मंत्रीच चालढकल करतात- घडामोडे

राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा सादर केला नाही. यासह भाजप ओबीसी मोर्चाविषयी आवाज उठवल्यानंतर आयोग स्थापन केला. मात्र आयोगाला आता सरकार कामच करू देत नाही, असा आरोपही ओबीसीचे नेते भगवान घडामोडे यांनी सांगितले. राज्य सरकारमधील ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी निर्णय घेण्याची क्षमता असतानाही ते मेळावे तसेच रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागले आहे. त्यांच्यात क्षमता आहेत. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयी निर्णय घेण्याची गरज असताना ते अशी भाषा करीत ओबीसी समाजाला खेळवत ठेवण्याचं काम हे लोक करत असल्याचा आरोपही घडामोडे यांनी केला. म्हणून ओबीसी समाजाला आम्ही जागृत करण्यासाठी आम्ही एक मोहीम यात्रा हाती घेतली आहे.

11 ऑक्टोबरला नाशकात मेळावा

ओबीसी समाजात जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्याची सुरुवा सुरुवात पंढरपूर येथून सुरुवात झाली आहेत. उद्या नाशिक येथे आहे तर 12 ऑक्टोबरला औरंगाबाद येथील यात्रा येणार आहेत. या मेळाव्यातून ओबीसींचे खरे मित्र कोण आणि शत्रू कोण हे यातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही पत्रकार परिषदेत भगवान घडामोडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस भगवान घडामोडे, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, शालिनी बुंधे, प्रा.गोविंद केंद्रे, राजेश मेहता, प्रा. राम बुधवंत उपस्थित होते.

इतर बातम्या- 

औरंगाबाद मनपा निवडणूक: प्रभाग पद्धतीने तयारी म्हणजे कोर्टाचा अवमान, याचिकाकर्त्याची निवडणूक आयोगाला नोटीस

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.