‘नाणार’मधील जमीन खरेदीची चौकशी होणार, समिती स्थापन; महिन्याभरात अहवाल

रत्नागिरी येथील नाणार येथे झालेल्या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना ही समिती महिनाभरात अहवला सादर करणार आहे.

'नाणार'मधील जमीन खरेदीची चौकशी होणार, समिती स्थापन; महिन्याभरात अहवाल
Nanar Refinery Supporters
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 6:49 PM

मुंबई: रत्नागिरी येथील नाणार येथे झालेल्या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना ही समिती महिनाभरात अहवला सादर करणार आहे, अशी माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे नेते अशोक वालम यांनी आज दिली. (land purchase in nanar investigation start)

आज कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेची विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी नाणारमध्ये बाहेरील लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. प्रकल्प रद्दच करण्यात आलेला आहे तर या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे नेते अशोक वालम यांनी पटोले यांच्याकडे केली. नाणार प्रकल्प घोषित केल्यानंतर नाणारमध्ये 2200 एकर जमीन खरेदी करण्यात आली. तर अध्यादेश निघाल्यानंतर 800 एकर जमिनीची खरेदी झाली, याकडेही वालम यांनी पटोलेंचे लक्ष वेधले. तसेच प्रकल्प रद्द झालेला आहे तर या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

या बैठकीत समितीतर्फे भावकीच्या सामुहिक मालकीच्या जमिनीची परस्पर विक्री होणे, बेपत्ता व मृत व्यक्तींच्या नावे बनावट आधार कार्ड काढून जमीनी विक्रीचे व्यवहार करणे, किंवा ठराविक कालावधीत अचानक खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होणे, असे अनेक मुद्दे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले. या बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सह सचिव संजय देगांवकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, अवर सचिव (उद्योग) किरण जाधव, अवर सचिव (भूसंपादन) मी. शि. नेहारे व इतर अधिकारी उपस्थित होते.

अशा प्रकारे नाणार प्रकल्पाच्या वेळी झालेले जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार संशायस्पद आहेत. प्रकल्पाची अधिसूचना निघण्याआधी कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करुन त्यांना उचित मोबदल्यापासून वंचित ठेवले गेले असल्यास ही एक प्रकारे भूमिपुत्रांची फसवणूक ठरते. परप्रांतीयांकडून अशा प्रकारे भूमीपुत्रांना फसविणे जाणे योग्य नाही. भविष्यात असे प्रकारे घडू नये यासाठी उपाययोजना केली जावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

त्यावर नाणारमध्ये जमीन अधिग्रहित करताना गैरव्यवहार झाला का याची चौकशी करण्यात येईल. रत्नागिरीच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत ही चौकशी होणार असून एक महिन्यात या समितीचा अहवाल येणार आहे, अशी माहिती पटोले यांनी दिल्याचं वालम यांनी स्पष्ट केलं. हे अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पटोले यांना समितीकडून सोपवले जाणार असल्याचेही ते म्हणाले. (land purchase in nanar investigation start)

संबंधित बातम्या:

‘नाणार’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा

Nilesh Rane | मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक नाणारच्या व्यवहारात, निलेश राणेंची पत्रकार परिषद

Uday Samant | नाणारमध्ये रिफायनरी होऊ देणार नाही : उदय सामंत

(land purchase in nanar investigation start)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.