Latur corona update | कोरोना रुग्ण वाढल्यामुळे लातूरमध्ये सोमवारपासून रात्रीची संचारबंदी, जाणून घ्या काय सुरु?, काय बंद?

| Updated on: Mar 14, 2021 | 7:32 PM

सोमवारपासून (15 मार्च) लातूल जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दींमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. (latur corona update night curfew)

Latur corona update | कोरोना रुग्ण वाढल्यामुळे लातूरमध्ये सोमवारपासून रात्रीची संचारबंदी, जाणून घ्या काय सुरु?, काय बंद?
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा मुले आणि तरुणांनाही सर्वाधिक धोका
Follow us on

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय. सोमवारपासून (15 मार्च) लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दींमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलीये. तसे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांनी दिले आहेत. हा कर्फ्यु रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत असेल. तसेच येत्या 31 मार्चपर्यंत आठवडी बाजारदेखील पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेयत. (Latur district collector ordered night curfew to prevent coronavirus spreading latur corona update)

रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यु

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे येथील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. जारी केलेल्या आदेशाप्रमाणे लातूरमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतच्या तीन किलोमिटरच्या त्रिज्येत रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदीचा आदेश लागू असेल. तसेच 31 मार्चपर्यंत सर्व आठवडीबाजार बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान या भागात सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. तसेच या भागात धार्मिक विधींना केवळ पाच लोकांना उपस्थित राहता येणार आहे. लग्नकार्यासाठीसुद्धा 50 पेक्षा जास्त लोक जमल्यास कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. धार्मिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने अशा कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत बंदी असेल.

लातूरमध्ये कोरोना रुग्णांची स्थिती काय?

लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 26927 वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत 25245 जण कोरोनामुक्त झाले आहेत. लातूरमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 716 जणांचा मृत्यू झाला आहे. तर लातूरमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 962 वर पोहोचली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करुनही अनेक ठिकाणी नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. हीच परिस्थिती लातूर जिल्ह्यामध्येसुद्धा आहे. लातूर शहर तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. येथील प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. आरोग्य यंत्रणेची तर झोप उडाली आहे. मात्र, येथे कोरोनाला थोपवण्यासाठी येथील यंत्रणेला म्हणावे तेवढे यश मिळत नाहीये. या सर्व गोष्टी तसेच नागरिकांकडून नियमांचे होत असलेले उल्लंघन लक्षात घेता, येथील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. सावंत यांनी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

इतर बातम्या :

Jalgaon corona | महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने कोरोना बरा, योगा शिक्षकाच्या अजब दाव्याने खळबळ

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताचा नंबर पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळच्याही मागे

(Latur district collector ordered night curfew to prevent coronavirus spreading latur corona update)