‘ब्रह्मदेव जरी आला तरी…, ‘ स्वतंत्र विदर्भावर काय म्हणाले वामनराव चटप, साल २०२७ पूर्वीच आम्ही….
डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आणि इतर राज्यासाठी असलेले 22 प्रतिनिधी दिल्लीत आंदोलन करणार असल्याची घोषणा वकील आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी केली आहे.

महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या मेलेले राज्य आहे. ब्रह्मदेव आला तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही.त्यामुळे आम्हाला स्वंतत्र विदर्भाचे राज्य देऊन वाचवावे अशी मागणी करत विदर्भ राज्य आंदोलन समितीने दंड थोपटले आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणीसाठी गेल्या 121 वर्ष चाललेली ही लढाई 122 व्या वर्षी कायमची निकाली निघणार आहे, कारण साल 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भाची स्थापना होणार असल्याची भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅडव्होकेट वामनराव चटप यांनी मांडली आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आजपासून सिंदखेड राजा येथे चटप यांनी आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्रवर प्रचंड मोठे कर्ज आहे. त्यामुळे हे राज्य आर्थिकदृष्ट्या मेलेले राज्य आहे. या राज्याला ब्रह्मदेव जरी आला तरी सक्षम करु शकणार नाही असे वामनराव चटप यांनी म्हटले आहे. स्वंतत्र विदर्भाची मागणी गेली १२२ वर्षे होत आहे. मात्र, आता ती घटिका समीप आली आहे. कारण साल २०२७ पूर्वी विदर्भ स्वतंत्र होणार म्हणजे होणारच असा दावा चटप यांनी केला आहे.
22 प्रतिनिधी दिल्लीत आंदोलन करणार
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात काँग्रेसचे नेते स.का.पाटील यांनी सुर्य आणि चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी घोषणा केली होती. तशाच प्रकारे आता ब्रह्मदेव आला तरी महाराष्ट्र सक्षम होऊ शकत नाही असे चटप यांनी विधान केले आहे.लढू करू किंवा मरू आणि युवकांच्या हाती सत्ता देऊ. डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आणि इतर राज्यासाठी असणारे 22 प्रतिनिधी दिल्लीत आंदोलन करणार आहेत अशी देखील माहिती वामनराव चटप यांनी दिली आहे. विदर्भ राज्य डिसेंबर 2027 चे आधी मिळवायचे म्हणजे मिळवायचेत आणि हे नवे विदर्भ राज्य युवा पिढीच्या हाती द्यायचे अशी घोषणाच बुलढाणा येथून वामनराव चटप यांनी केली आहे.