AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिटकरी तुझ्याकडे…आहे ,’ तर टाक मला जेलात, हाके यांचे मिटकरी यांना खुले चॅलेंज

लक्ष्मण हाकेला चांगली गाडी दिली म्हणून अमोल मिटकरीच्या पोटात दुखतंय, परंतु तुझ्या आकाची पोरं किती कोटीच्या गाडीत फिरतात? हे आम्ही तुला विचारले का ? असा सवालही हाके यांनी करीत अजित पवार यांच्यावरही कोरडे ओढले आहेत.

'मिटकरी तुझ्याकडे...आहे ,' तर टाक मला जेलात, हाके यांचे मिटकरी यांना खुले चॅलेंज
laxman hake and amol mitkari
| Updated on: May 30, 2025 | 6:37 PM
Share

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नवी कोरी फॉर्च्युनर कार घेतली आहे. या फॉर्च्युनर कारवरुन आता घमासान सुरु झाले आहे. आपण ओबीसींच्या प्रश्नांवर प्रवास करीत असतो. त्यामुळे जनतेने आपल्याला ही भेट दिल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी हाके यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला अखेर लक्ष्मण हाके यांनी देखील त्याहून तिखट भाषेत उत्तर दिले आहे.

लक्ष्मण हाके प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की,’ मिटकरी आपण वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात. या सदसत्वाला शोभेल अशी भाषा तुम्ही वापरा आम्ही जर बोलायला लागलो तर तुमचे सोडा, तुमच्या आकाचेही कपडे अंगावर राहणार नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरीनी थोडं औकातीत बोलावं असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. ते पुढे एकदम एकेरीवर आले आणि म्हणाले की अमोल मिटकरी हा अजितदादा पवार यांच्या घरात झाडू पोछा आणि टॉयलेट साफ करणारा आमदार आहे. आजपर्यंत याला बाजारू विचारवंत म्हणून ओळखले जात होते असे हाके यांनी सुनावले आहे.

अमोल मिटकरी हा स्वतःला ओबीसीचा नेता समजतो, विधानपरिषदेचा आमदार झाल्यावर ओबीसीच्या किती प्रश्नावर त्यानं आवाज उठवला. जन्माने ओबीसी असून चालत नाही. कर्तृत्वाने ओबीसीचा लीडर असावे लागते असेही हाके यांंनी यावेळी मिटकरी यांनी सुनावले आहे.

जरांगे पाटलांना ओबीसीतूनच का आरक्षण पाहिजे, त्यावेळेस “तू कोणाचे *** होते का ” अशी खालच्या भाषेत हाके यांनी अमोल मिटकरी यांच्यावर यावेळी टीका केली आहे. गेल्यादोन वर्षांपासून जरांगे- पाटील बेकायदेशीर मागण्या करीत आहे, ओबीसींना घरात घुसून मारण्याची भाषा करत आहे. ओबीसीच्या नेत्या विरोधात बोलत आहे आणि तू जन्माने ओबीसी आणि कर्तृत्वाने अजितदादाचा झाडू पोचावाला… तू आम्हाला शिकवतो का ओबीसीची चळवळ काय ? याच अजितदादाने शेअर मार्केटला लाजवेल अशी सारथीची बिल्डिंग उभी केली. मग महाज्योतीला कार्यालय नाही का नाही ?

अजितदादाच्या हाताला लकवा मारलाय काय ? तू ओबीसींच्या प्रश्नांनावर तू मला yz म्हणतो? झाकण झुल्या म्हणतो ? तुझ्यात हिमंत असेल दम असेल तर ये समोर… जन्माने ओबीसी आहे ना तर कर की ओबीसीचे आंदोलन उभे, असे म्हणत अमोल मिटकरी यांना हाके यांनी अत्यंत शेलक्या भाषेत खुले चॅलेंज दिले आहे.

एका मेंढपाळाच्या पोराला गाडी दिली तर ..

अजित पवार गेले 20 वर्ष अर्थमंत्री पदावर का बसलाय? पीएचडी केली काय त्यांनी ? पोल्ट्री फार्मवाले अजित पवार काकांच्या जीवावर राजकारणात आले. अर्थशास्त्रामधला सोशल जस्टीस आणि इंजस्टीस म्हणजे काय हे तर माहिती आहे का? अमोल मिटकरी हा फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातला आमदार आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे एका मेंढपाळाच्या पोराला गाडी दिली तर हा या विषयावर बोलतो. बजेटरी वरती अभ्यासपूर्ण बोला ना? अमोल मिटकरी तुझ्याकडे ईडी सीबीआय आहे. तर टाक मला जेलात..अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अमोल मिटकरी यांच्यासह अजित पवार यांचाही खरपूस समाचार आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.