AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचं अपहरण, बेदम मारहाण, Video समोर

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे, मोठी बातमी समोर आली आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याचं अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचं अपहरण, बेदम मारहाण, Video समोर
जीवन घोगरे यांचं अपहरण Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 22, 2025 | 6:42 PM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, हत्या, मारहाण, चोरी या सारख्या घटना घडत असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं नांदेडसह राज्यात खळबळ उडाली आहे. नांदेडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचं अपहरण करण्यात आलं, अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्यांची सुटका देखील करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जीवन घोगरे यांचं नेमकं अपहरण का करण्यात आलं? आणि त्यांना मारहाण का करण्यात आली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडे आकराच्या दरम्यान जीवन घोगरे यांंचं अपहरण करण्यात आलं होतं,  नांदेडच्या सिडको भागातील ही घटना आहे. चार चाकी वाहनातून आलेल्या काही जणांनी जीवन घोगरे यांचं अपहरण केलं, त्यानंतर त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आली, या घटनेत घोगरे हे गंभीर जखमी झाले आहेत.  त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांचं अपहरण नेमकं का आणि कशासाठी करण्यात आलं, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?  

दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे की, घटनास्थळी एक गाडी उभी आहे, याच गाडीतून घोगरे यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर ती गाडी सुसाट वेगानं पुढे निघून गेली, घोगरे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं नांदेडसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला