महाराष्ट्राला केवळ 2 कॅबिनेट मंत्रिपद, तर 4 राज्यमंत्रीपद, नेमकी कुणाकुणाला संधी?
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळाचा कार्यक्रम आज पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील भाजपचे खासदार नारायण राणे यांना डच्चू देण्यात आला. तर नितीन गडकरी यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिपदाची संधी देण्यात आली. तसेच पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत जिंकून येणारे उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनाही केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

अठराव्या लोकसभा निवडणुकीनंतर अखेर आज एनडीए आघाडीचं सरकार देशात स्थापन होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 69 खासदारांनी केंद्रीय कॅबिनेट आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाकुणाला संधी मिळेल? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडेल? याबाबत उत्सुकता होती. अखेर याबाबचं चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रपती भवनात आज मोदी 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधीचा शाही सोहळा आयोजित करण्यात आला. मोदी 3.0 सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 खासदारानी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी महाराष्ट्राला 2 कॅबिनेट मंत्रिपद मिळाली. तर 4 राज्यमंत्रीपदं देण्यात आली.
शपथविधीच्या आजच्या कार्यक्रमात सर्वात आधी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह हे लखनौ लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. राजनाथ सिंह हे 2014 ते 2019 या काळात देशाचे केंद्रीय गृहमंत्री होते. यानंतर 2019 ते 2024 या कार्यकाळात ते केंद्रीय संरक्षण मंत्री राहिले आहेत.
राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अमित शाह यांच्यानंतर महाराष्ट्राचे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मोदींचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते तथा उत्तर मुबई मतदारसंघाचे खासदार पीयूष गोयल यांनी केंद्रीय कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्राच्या आणखी 4 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण या चारही मंत्र्यांना केंद्रीय कॅबिनेट नाही तर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली.
महाराष्ट्रात ‘या’ खासदारांची राज्यमंत्रीपदी वर्णी
- शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. तसेच त्याआधी त्यांनी आमदारकीचीदेखील हॅटट्रीक मारली होती. प्रतापराव जाधव यांची आता केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार दिला आहे.
- भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचीदेखील मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रक्षा खडसे या तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
- भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित तरुण खासदार मुरलीधर मोहोळ यांनादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
- आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीदेखील आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोदींच्या नेतृत्वातील याआधीच्या सरकारमध्येही रामदास आठवले हे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. त्यांची आता पुन्हा राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.
मोदी सरकारच्या खातेवाटपाची संपूर्ण यादी
- राजनाथ सिंह – संरक्षण (Defence Ministry)
- अमित शाह – गृह (Home Ministry)
- अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री (Ministry of Information and Broadcasting and Railway Ministry)
- एस. जयशंकर – परराष्ट्र (foreign ministry)
- नितीन गडकरी – परिवहन, रस्ते विकास (Transport, Road Development Ministry)
- शिवराज सिंह चौहान – कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास (Agriculture / Panchayat Ministry)
- मनोहर लाल खट्टर – ऊर्जा, शहरी विकास (Energy Ministry)
- सीआर पाटील – जलशक्ती (Ministry of water power)
- मनसुख मांडविया – कामगार (Ministry of Labour)
- जेपी नड्डा – आरोग्य, रसायन आणि खते (Ministry of Health)
- ललन सिंह – पंचायत राज आणि मत्स्य उत्पादन (Panchayat raj Ministry)
- डॉ. विरेंद्र कुमार – समाजिक न्याय आणि अधिकारीता (Ministry of Social Justice and Empowerment)
- चिराग पासवान- क्रीडा (Ministry of Sport)
- किरेन रिजिजू – संसदीय कार्य (Parliamentary Affairs Ministry)
- अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास (Women and Child Development Ministry)
- राम मोहन नायडू – नागरी उड्डाण (Ministry of Civil Aviation)
- सर्वानंद सोनोवाल – जहाज बांधणी (Ministry of Shipbuilding)
- ज्युवेअल राम – आदिवासी कार्य (Ministry of Tribal Affairs)
- किशन रेड्डी – कोळसा आणि खणन (Coal and Mining)
- निर्मला सीतारामण – अर्थ (Finance Ministry)
- जीतन राम मांझी – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (Micro Small and Medium Enterprises)
- धर्मेंद्र प्रधान – शिक्षण (Education Ministry)
- एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग (Heavy Industry)
- ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम (Telecom)
- भूपेंद्र यादव -पर्यावरण (Environment)
- प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण (Customer Protection)
- गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक (Art, Tourism, Culture)
- पीयूष गोयल – वाणिज्य (Commerce)
- हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम (Petroleum)
- गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग (Textile Industry)
स्वतंत्र प्रभार
- इंदरजित सिंग राव – सांख्यिकी और कार्यक्रम कार्यान्वयन, नियोजन (Statistics and Programme Implementation, Planning)
- जितेंद्र सिंग – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पीएमओ कार्यालय, अॅटोमिक एनर्जी आणि अंतराळ विभाग (Science and Technology, Earth Sciences, PMO Office, Department of Atomic Energy and Space)
- अर्जुन मेघवाल – विधी आणि न्याय, संसदीय कार्य (Law and Justice, Parliamentary Affairs)
- प्रतापराव जाधव – आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण ( AYUSH, Health and Family Welfare)
- जयंत चौधरी – कौशल्य, शिक्षण (Skills, Education)
राज्यमंत्री
- जतीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
- श्रीपाद नाईक – ऊर्जा
- पंकज चौधरी – अर्थ
- कृष्णा पाल – सहकार
- रामदास आठवले – समाजिक न्याय आणि अधिकारीता
- रामनाथ ठाकूर- कृषी आणि शेतकरी विकास
- नित्यानंद राय – गृह मंत्रालय
- अनुप्रिया पटेल- आरोग्य आणि कुटुंब विकास, रसायन आणि खते
- व्ही. सोमण्णा – जलशक्ती आणि रेल्वे
- डॉ. चंद्रशेखर पेमासानी – ग्रामिण विकास आणि दळणवळण
- एसपी बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायत राज
- शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार
- बीएल वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
- अजय टमटा – परिवहन आणि रस्ते
- हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते
- शांतनू ठाकूर – जहाज बांधणी
- रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक
- सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक
- रक्षा खडसे- क्रीडा आणि युवक कल्याण
- मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण (Ministry of Civil Aviation)