AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले, कुटुंबियांना मोठा दिलासा

राज्य सरकारच्या परवानगीनंतर बीड जिल्हा प्रशासनाने राजस्थानच्या कोटा येथे अडकलेल्या 60 विद्यार्थ्यांना अखेर बीड शहरात आणलं आहे (Students stranded in Kota returned to Beed).

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले, कुटुंबियांना मोठा दिलासा
| Updated on: Apr 28, 2020 | 9:30 PM
Share

बीड : राज्य सरकारच्या परवानगीनंतर बीड जिल्हा प्रशासनाने राजस्थानच्या कोटा येथे लॉकडाऊनदरम्यान अडकलेल्या 60 विद्यार्थ्यांना अखेर बीड शहरात आणलं आहे (Students stranded in Kota returned to Beed). कोटामध्ये अडकलेले बीड जिल्ह्यातील 60 विद्यार्थी आज दुपारी दोन वाजता शहरात दाखल झाले. एका खासगी ट्रव्हल्सने त्यांना राजस्थानातून बीड शहरात आणण्यात आलं. विद्यार्थी परत आल्याने कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे (Students stranded in Kota returned to Beed).

बीड शहरात दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना बस स्थानकाच्या पाठिमागे असणाऱ्या रोडवर सोडण्यात आलं. तिथे शिवाजीनगर पोलीस आधीपासून दाखल झाले होते. पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेलं. चौकशीनंतर सर्वांना घरी सोडण्यात आलं.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. देशात सध्या सामान्य नागरिकांना कुठेही येण्या-जाण्यास, प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 2 हजार विद्यार्थी हे राजस्थानमधील कोटा येथे अडकून पडले. या विद्यार्थ्यांना आपल्या घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकार या विद्यार्थांना परत आणण्यासाठी 100 एसटी बस सोडणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल दिली होती. त्यानंतर आज बीड जिल्ह्यातील 60 विद्यार्थी बीडमध्ये दाखल झाले.

आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा येथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटा येथे शिकायला गेलेल्या महाराष्ट्राच्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. यामध्ये 60 विद्यार्थी हे बीड जिल्ह्यातील आहेत. पहिला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत संपणार होता. त्यावेळेस या विद्यार्थ्यांना 14 एप्रिलपर्यंत येथेच राहा, मग पुढे पाहू, असे तेथील शिक्षणसंस्थांनी सांगितले होते.

यानुसार हे विद्यार्थी तेथेच थांबले. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आल्याने हे विद्यार्थी येथे अडकून पडले. महाराष्ट्रात परत येण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सरकारकडे मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चाही केली होती.

संबंधित बातम्या :

दुसरा प्रस्ताव दिला, राज्यपाल विचार करतो म्हणाले, आम्ही राजकीय भाष्य करणार नाही : जयंत पाटील

Pune Corona Update | …तर 18 मेपर्यंत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9600 पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.