
मुंबई : देशभरात लोकसभेच्या निवडणूकांनी राजकारण तापले आहे. लोकसभा 2024 च्या निवडणूकीच्या तिसरा टप्प्यासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात मतदान होणार आहे. लोकसभा 2024 निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, डींपल यादव, शिवराज सिंह चौहान आदी नशीब आजमाविणार आहेत. 7 मे रोजी लोकसभा 2024 च्या निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मतदानात एकूण 1,351 उमेदवार नशिब आजमाविणार आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी गुजरात राज्यातून 26 लोकसभा मतदार संघातून सर्वाधिक 658 उमेदवारी अर्ज आले. तर त्याखालोखाल महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांतून 519 उमेदवारी अर्ज आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तिसरा टप्पा – 7 मे रोजी मतदान रायगड – अनंत गीते ( ठाकरे...