भिवंडीत कमळ फुलणार की तुतारी वाजणार ? बाळ्या मामा अन् कपिल पाटील आमनेसामने !

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच उमेदवारांनी विजयासाठी जीवाचं रान केलं आहे. ठाणे जिल्ह्यातील राजकारणही रंगतदार झालं असून आता भिवंडी लोकसभेची चर्चाही जोरदार सुरू आहे. येथील लढत ही चुरशीची होणार असून आरोप प्रत्यारोपामुळे भिवंडी आता तापली आहे. भिवंडीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आमनेसामने आले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा हे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधत असतानाच कपिल पाटीलही त्यांना चोख प्रत्युत्तर देतान दिसत आहेत.

भिवंडीत कमळ फुलणार की तुतारी वाजणार ? बाळ्या मामा अन् कपिल पाटील आमनेसामने !
भिवंडीत कमळ फुलणार की तुतारी वाजणार ?
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 9:22 AM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच उमेदवारांनी विजयासाठी जीवाचं रान केलं आहे. ठाणे जिल्ह्यातील राजकारणही रंगतदार झालं असून आता भिवंडी लोकसभेची चर्चाही जोरदार सुरू आहे. येथील लढत ही चुरशीची होणार असून आरोप प्रत्यारोपामुळे भिवंडी आता तापली आहे. भिवंडीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आमनेसामने आले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा हे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधत असतानाच कपिल पाटीलही त्यांना चोख प्रत्युत्तर देतान दिसत आहेत. त्या दोघांच्या लढाईत आता कोण सरस ठरणार ? भिवंडीत यंदा कमळ फुलणार की तुतारी वाजणार? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

तिसऱ्या संधीसाठी कपिल पाटील रस्त्यावर’, सुरेश म्हात्रेंचा टोला

निवडणूक म्हटली की आरोप, प्रत्यारोप हे आलेच. भिवंडीतही तीच स्थिती आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा यांनी कपिल पाटील यांच्यावर टीका केली आहे. 2014, 2019 च्या निवडणुकीत कपिल पाटील कोणता मोहल्ला, बिल्डिंगमध्ये गेलेले दिसले का? आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात. याचे श्रेय सर्व मतदारांचे आहे. ज्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि तिसऱ्यावेळी ‘रस्त्यावर’ आणले आहे,’ असे म्हणत म्हात्रे यांनी थेट पाटलांवर निशाणा साधला.

माझ्या विरोधात लढण्यासाठी 17 पक्ष फिरले पण..

कपिल पाटील हे आता रस्त्यावर उतरून प्रचार करत असल्याची बाळ्या मामा यांची टीका पाटील यांना चांगलीच झोंबली. कपिल पाटील यांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या आशीर्वादाने मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. या लोकसभा क्षेत्रात प्रचंड उत्साह आहे असं पाटील यांनी सांगितलं. काही लोकांकडे माझ्यावर टीका करण्याशिवाय काहिच नाही, जेवढी माझ्यावर टीका करतील तेवढी माझी मत वाढतील, कारण लोकांना माहीत आहे मी 10 वर्षात काय काम केले अस सांगत पाटील यांनी बाळ्या मामा यांचा समाचार घेतला. टीका करणाऱ्ंयाना मी गांभीर्याने घेत नाही. सगळ्या विश्वाने मान्य केलं आहे की मोदी यांनी काय काम केलं आहे.

माझ्या विरोधात लढण्यासाठी 17 पक्ष फिरले पण 17 वेळा उमेदवारी नाही मिळाली असा मिश्किल टोलाही पाटील यांनी हाणला. लोकं बोलतात जितक त्यांचं वय नाही तितके त्यांनी पक्ष बदलले. कोणी किती पक्ष बदलावे यावर भाष्य करण्याचे कारण नाही कारण जनतेला माहीत आहे. आणि 4 जून नंतर तर कोणत्या पक्षात राहणार आहे ते ही जनतेला माहीत आहे. माणसाला स्थिरता पाहिजे. कुठेतरी माणूस स्थिर बसला पाहिजे . नशीब निष्ठा वैगरे अजून काही तर बोलले नाही असा टोमणा मारायलाही पाटील विसरले नाही. एकंदरच भिंवडीत वातावरण तापलं असून येत्या काळात आणखी काय घडतंय याकडे लक्ष लागलं आहे. आता भिवंडी लोकसभेत कमळ फुलणार की तुतारी वाजणार हे 4 जून नंतरच समजेल.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.