AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज ‘लोकसभेचा महासंग्राम’, टीव्ही9च्या महाचर्चेत राजकीय गौप्यस्फोट होणार?

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. देशभराचे लक्ष लागलेली निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांमध्ये सध्या जागावाटपाबाबत जोरदार खलबतं सुरू आहेत. तसेच निवडणुकीसाठी खास रणनिती आखण्यासोबतच मोर्चेबांधणीची कामं वेगाने सुरू आहेत. दरम्यान याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही9 मराठीकडून आज 'लोकसभेचा महासंग्राम' या विशेष कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे.

आज 'लोकसभेचा महासंग्राम', टीव्ही9च्या महाचर्चेत राजकीय गौप्यस्फोट होणार?
| Updated on: Mar 01, 2024 | 9:04 AM
Share

मुंबई | 1 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. देशभराचे लक्ष लागलेली निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांमध्ये सध्या जागावाटपाबाबत जोरदार खलबतं सुरू आहेत. तसेच निवडणुकीसाठी खास रणनिती आखण्यासोबतच मोर्चेबांधणीची कामं वेगाने सुरू आहेत. दरम्यान याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही9 मराठीकडून आज ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. टीव्ही९ मराठीतर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आज, 1 मार्च रोजी वाय.बी. चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात पार पडणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.

48 जागा असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी युती आणि आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील मातब्बर नेत्यांचे डावपेच कसे असतील, राज्याचा मूड काय आहे, मतदारांचा कौल कुणाला असेल, निवडणुकीसाठी रणनिती काय, यासारख्या अनेक विषयांवर आज ‘लोकसभेचा महासंग्राम’ या वैचारिक मंचावर राजकीय खडाजंगी होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडतील.

या मान्यवरांची विशेष उपस्थिती

सताधाऱ्यांसह विरोधी गोटातील बडे नेते तुम्हाला एकाच मंचावर पाहायला मिळतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे, आणि शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत हे मान्यवर नेतेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आज या विचार मंचावर राज्यातील नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळेल. हे सर्वपक्षीय नेते आज टीव्ही९ मराठीच्या या कॉनक्लेव्हमध्ये कोणते गौप्यस्फोट करतात, काय दावे करतात, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. आज दिवसभर हा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.

राजधानीत पार पडलं सत्ता संमेलन

‘टीव्ही9 भारतवर्ष’कडून दरवर्षी आयोजित ‘सत्ता संमेलनात देश आणि राज्यांचा कल समजतो. या ‘सत्ता संमेलना’त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते भाग घेऊन चर्चा आणि मुलाखतींच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असतात. यंदा 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान राजधानी दिल्लीत What India Thinks Today हे कॉनक्लेव्ह पार पडलं. या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी ‘सत्ता सम्मेलन’ चे आयोजन करण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी, भगवंत मान, स्मृती इराणी यांसारख्या अनेक राजकारण्यांनी या कार्यक्रमात उपस्थित रहात त्यांचे विचार मांडले. तसेच अभिनेता आमिर खान, आयुष्मान खुराना, कंगना रानौत, रवीना टंडन यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कार्यक्रमात उपस्थिती लावून विविध विषयांवर मनमोकळेपणे मतं मांडली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.