AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिशान बंगले, फार्म हाऊस, सोने – चांदी, महागड्या कार आणि… भोंदूबाबा खरातची गंडगंज संपत्ती.. आकडा थक्क करणारा

Ashok Kharat: राजकीय नेते, बडे अधिकारी, सेलिब्रिटी यांना जाळ्यात ओढून कमावली कोट्यवधींची माया... भोंदूबाबा खरात खरा चेहरा समोर... बाबाची गंडगंज संपत्तीचा आकडा थक्क करणारा...

आलिशान बंगले, फार्म हाऊस, सोने - चांदी, महागड्या कार आणि... भोंदूबाबा खरातची गंडगंज संपत्ती.. आकडा थक्क करणारा
Ashok Kharat
| Updated on: Mar 20, 2026 | 1:44 PM
Share

Ashok Kharat: सध्या एका नावामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. ते नाव म्हणजे भोंदूबाबा कॅप्टनर अशोक खरात… श्रीमंत लोंकांकडून पैसे उकळणारा आणि मध्यमवर्गीय महिलांचे लैगिंक शोषण करण्याऱ्या बाबाचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता त्यांच्या संपत्तीचा आकडा आणि कुठे – कुठे संपत्ती आहे… याबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे…

आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे एसआयटीचं प्रमुखपत्र दिल्याची माहिती समोर येत आहे… तपासात राजकीय मंडळींपासून सेलिब्रिटी देखील खरातचे भक्त असल्याची देखील माहिती समोर आली आहे. राजककीय मंडळी, प्रशासनातील उच्च पदावरील अधिकारी एवंढच नाही तर, सेलिब्रिटींना देखील आपल्या भक्तीच्या जाळ्यात अडकवून भोंदूबाबाने गडगंड संपत्ती जमा केलेली. पोलीस तपासात भोंदूबाबाच्या संपत्ती आकडा समोर आला आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहर, सिन्नर येथे आलिशान बंगले, मीरगाम येथे फार्म हाऊस आणि स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावावर जमिनी… सोने, चांदी… दोन महागड्या गाड्या… अशी एकून 200 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक भोंदूबाबा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ

भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये IPS तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली SIT अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरातची झाडाझडती सुरू असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आता याप्रकरणात सरकार कुणा कुणाला अटक करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी

बलात्कार प्रकरणातील कथित आरोपी भोंदूबाबा अशोक खरत याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर असल्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. रुपाली चाकणकर यांचा येत्या दोन दिवसात राजीनामा घेण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सीएमओ कार्यालयाकडून याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली आहे. चाकणकर यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम