विकेंडला फिरायचा प्लॅन आहे? महाबळेश्वर आणि पाचगणी अटीशर्थींसह पर्यटकांसाठी खुलं

संतोष नलावडे

संतोष नलावडे | Edited By: सागर जोशी

Updated on: Jun 18, 2021 | 11:26 PM

महाबळेश्वर आणि पाचगणी शनिवार (19 जून) पासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात येत आहे. मात्र, महाबळेश्वर आणि पाचगणीला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे

विकेंडला फिरायचा प्लॅन आहे? महाबळेश्वर आणि पाचगणी अटीशर्थींसह पर्यटकांसाठी खुलं
महाबळेश्वर, वेण्णा तलाव

सातारा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरुन घेतला जात आहे. मात्र, त्यासाठीही काही अटीशर्थी, कोरोना नियमावली आखून देण्यात येत आहे. या विकेंडला तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महाबळेश्वर आणि पाचगणी शनिवार (19 जून) पासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात येत आहे. मात्र, महाबळेश्वर आणि पाचगणीला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. (Mahabaleshwar and Pachgani Open for tourists)

महत्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमच्या आसपासच्या टेस्टिंग सेंटरवरुन कोरोना टेस्ट करुन महाबळेश्वर किंवा पाचगणीला जाण्याचा विचार करत असाल तर तो अहवाल गृहित धरला जाणार नाही. महाबळेश्वर आणि पाचगणीला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आली तरच तुम्हाला महाबळेश्वरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. साताऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदीच्या नियमात शिथिलता देऊन काही निर्बंध उठवले आहेत. त्यानुसार शनिवारी सकाळपासून महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

टाळेबंदीच्या नियमात कशाप्रकारे शिथीलता देण्यात आली

वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रांताधिकारी यांनी निर्बंध शिथलते बाबत सविस्तर माहीती दिली. येणाऱ्या पर्यटकांना करोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. करोना चाचणीचे अहवाल सोबत घेऊन येणाऱ्या पर्यटकांचीही पांचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी केली जाणार आहे. या चाचणीत ज्यांचे अहवाल निगेट्विह येतील अशाच पर्यटकांना पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

हॉटेल व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी कठोर नियमावली

बाजार पेठेतील दुकानदारांनाही करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. व्यापारी आणि हॉटेल मधील कामगार यांची दर दहा दिवसांनी कोरोना तपासणी करण्यात येईल. करोना बाबतचे सर्व नियम हॉटेल व्यवसायिक आणि व्यापारी यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला गट विकास अधिकारी नारायण घोलप , पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, महाबळेश्वर पालिकेच्या कर निरीक्षक भक्ती जाधव, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी यांच्यासह अन्य हॉटेल व्यावसायीक, तसंच व्यापारी प्रतिनिधी अतुल सलागरे यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

पुण्यात शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद, वाढत्या गर्दीमुळे महापालिकेचा निर्णय

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, शनिवारपासून राज्यात 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरणास सुरुवात

Mahabaleshwar and Pachgani Open for tourists

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI