AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद, वाढत्या गर्दीमुळे महापालिकेचा निर्णय

पुण्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकानं बंद राहणार आहेत. वाढत्या गर्दीमुळं पालिकेनं हा निर्णय घेण्यात आलाय. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद, वाढत्या गर्दीमुळे महापालिकेचा निर्णय
पुणे महापालिका
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 9:27 PM
Share

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातही कोरोना संसर्गाचा धोका कमी झालाय. अशावेळी पुण्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, शिथिलता मिळाल्यानंतर पुणेकर मार्केट आणि दुकानांमध्ये मोठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी मॉल, दुकानं आणि सलून बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. पुण्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकानं बंद राहणार आहेत. वाढत्या गर्दीमुळं पालिकेनं हा निर्णय घेण्यात आलाय. शनिवारी आणि रविवारीही हा नियम लागू असणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. (All shops in Pune closed on Saturdays and Sundays except for essential services)

पुणे महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार आणि रविवार केवळ पार्सल सेवा देता येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी

पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (The Serum Institute of India (SII) आता लहान मुलांसाठी कोव्हिड लसीची चाचणी घेणार आहे. नोव्हाव्हॅक्सच्या (Novavax) कोव्होवॅक्स (Covovax) या कोरोना लसीच्या क्लिनीकल चाचणीसाठी सीरमला परवानगी मिळाली आहे. देशात लहान मुलांवर केली जाणारी ही चौथी चाचणी ठरणार आहे.

जुलै महिन्यात चाचणी होणार

सीरम इन्स्टिट्यूट जुलै महिन्यात लहान मुलांवरील कोव्होवॅक्सची क्लिनीकल चाचणी सुरु करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अमेरीकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनीने कोव्होवॅक्स ही कोव्हिडवरील लस तयार केली आहे. सप्टेंबर महिन्यात 18 वर्षांवरील वयोगटासाठीही कोव्होवॅक्स लस बाजारात आणण्याची तयारी सीरम करत आहे.

कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क

कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी आपले नातेवाईक, मित्र, जवळच्या व्यक्तींना गमावलं. काही लहानग्यांनी तर आपले आई-वडील अशा दोघांनाही गमावलं आहे. अशा कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पुणे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क राहील, असा निर्णय पुणे प्रशासनाकडून घेण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील 26 बालकांनी आपल्या दोन्ही पालकांना गमावलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची माहिती दिलीय.

संबंधित बातम्या : 

कोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्रांदची मागणी

महापालिकेच्या सम-विषमच्या आदेशाला केराची टोपली, पिंपरी चिंचवडमध्ये दुकाने सुरुच

All shops in Pune closed on Saturdays and Sundays except for essential services

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.