पुण्यात 792 शाळांची वीज कापली पुन्हा जोडली, कोल्हापूरमध्ये 148 जिल्हा परिषद शाळांची वीज कनेक्शन कट, पुढं काय घडणार?

| Updated on: Nov 18, 2021 | 9:54 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 62 शाळांच वीज कनेक्शन कायमचं तोडण्यात आलंय. तर, 86 शाळांचं वीज कनेक्शन तात्पुरत्या स्वरुपात तोडण्यात आलंय.

पुण्यात 792 शाळांची वीज कापली पुन्हा जोडली, कोल्हापूरमध्ये 148 जिल्हा परिषद शाळांची वीज कनेक्शन कट, पुढं काय घडणार?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

कोल्हापूर : महावितरणनं थकित वीज वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. राज्यातील वीज बिल थकबाकीदारांची वीज कनेक्शन कापण्याची सुरुवात महावितरणनं सुरु केलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 62 शाळांच वीज कनेक्शन कायमचं तोडण्यात आलंय. तर, 86 शाळांचं वीज कनेक्शन तात्पुरत्या स्वरुपात तोडण्यात आलंय. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांसदर्भात कोणती भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील 792 शाळांची वीज कनेक्शन कापणाऱ्या महावितरणनं ती पुन्हा जोडली होती. कोल्हापूरमध्ये पुण्यासारखा निर्णय होणार काय याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

थकबाकी 60 लाखांवर

कोल्हापूरमधील 62 जिल्हा परिषद शाळांची थकबाकी असल्यानं त्यांची वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडण्याचा निर्णय महावितरणनं घेतला आहे. शाळांची एकूण थकबाकी 60 लाख रुपयांवर पोहोचलेली आहे. थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून वीज कनेक्शन कपातीची कारवाई करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचं नुकसान होणार

कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्हा परिषद शाळा गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. दुसरीकडे दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर 62 शाळांची वीज कनेक्शन कायमस्वरुपी आणि 86 शाळांच कनेक्शन तात्पुरतं तोडण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाला तोंड द्यावं लागणार आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत शैक्षणिक विद्युत उपकरणे वापरताना अडचणी येणार आहेत.

पुण्यात 792 शाळांची वीज कनेक्शन कापली आणि पुन्हा जोडली

महावितरणचं वीजबिल थकवल्यानं पुणे जिल्ह्यातील 792 शाळा अंधारात गेल्या होत्या. वीजबिल न भरल्यानं कनेक्शन कट करण्यात आलं होतं. तर, 192 शाळांच मीटर काढून नेण्यात आले होते. पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 शाळा आहेत त्यापैकी 664 शाळांच कनेक्शन कट करण्यात आलं होतं,तर 192 शाळांच मीटर काढलं होतं. मात्र, टीव्ही 9 मर

इतर बातम्या:

विधान परिषदेची रणधुमाळी, सतेज पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार, कोल्हापूरमध्ये हाय व्होल्टेज लढत

चांगली बातमी! नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार, मोदी सरकार लवकरच घोषणा करणार

Mahadiscom cut 148 zp schools due to non payment of electricity bill