AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Mayor : ‘वायरमनची मुलगी ते महापौर ! महापौरपदासाठी हर्षाली चौधरी यांनी भरला अर्ज

ग्रामीण भागात विकसित करण्याचा माझं पहिलं व्हीजन असणार आहे. पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. पहिल्यांदा नगरसेवक झाले, त्यानंतर आम्ही थांबायचं विचार केला होता. मात्र त्यानंतर विचार आला की पुन्हा चांगली सुरुवात करू आणि आम्ही सुरुवात केली असेही महापौर पदाच्या दावेदार हर्षाली चौधरी यांनी म्हटले आहे. आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे.

KDMC Mayor : 'वायरमनची मुलगी ते महापौर ! महापौरपदासाठी हर्षाली चौधरी यांनी भरला अर्ज
Harshali Chaudhari
| Updated on: Jan 30, 2026 | 6:04 PM
Share

कल्याण डोंबिवलीचा महापौर कोणाचा होणार हे आता स्पष्ट झाले आहे. महापौर पदासाठी शुक्रवारी ( 30 जानेवारी 2026 ) शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थवील-चौधरी यांनी अर्ज भरला असून त्यांची बिनविरोध निवड पक्की झाली आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे राहुल दामले यांनी अर्ज भरला आहे. या निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवलीला महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी आपला प्रवास कथन केला आहे. एक वायरमनची मुलगी ते दोनदा नगरसेवक आणि आता महापौर म्हणून त्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रथम नागरिक होणार आहेत. विरोधक नसल्याने ३ फेब्रुवारी रोजी हर्षाली चौधरी अधिकृतपणे महापौर पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

आपला प्रवास कथन करताना हर्षाली चौधरी यांनी सांगितले की, माझे वडील एमएसईबीत वायरमन होते. मला सर्वजण वायरमनची मुलगी म्हणून हाक मारायचे. आज माझे वडील हयात नाहीत. मला जे पद मिळालेला आहे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले आहे.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे तसेच आमदार आणि जिल्हाप्रमुख आणि जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवलाय यासाठी मी सगळ्यांचे आभार मानत आहे. मी आता विकास कामावरती भर देणार आहे. रखडलेले प्रोजेक्ट नव्याने सुरू करणार आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्यासह इतर विकास कामाला प्राधान्य असणार आहे.

मला वायरमनची मुलगी म्हणायचे

‘लाडकी बहीण’ म्हणून मी महिला सक्षमीकरणाचे काम करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर ‘लाडकी बहिण’ म्हणून जो विश्वास दाखवला त्यामुळे लाडक्या बहिणीला सक्षम करणार आहे. माझे वडील वायरमन होते. एमएसईबीमध्ये कामाला होते. 93 साली आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी आम्हाला 30 ते 40 वर्ष झाले आहेत. याआधी मला प्रत्येक जण बोलायचे वायरमनची मुलगी. त्यांच्यामुळे माझा हा प्रवास सुरू झाला.माझ्या प्रवासाला माझ्या वडिलांची पुण्याई कामी आली. वडिलांनी मला साथ दिली. वडिल असते तर आनंद वेगळा असतो, असे भावूक होत हर्षाली चौधरी यांनी सांगितले.

हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा कठीण होता

माझे सासू-सासरे भाऊ आणि माझी पती देखील माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. मुख्य म्हणजे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्यामुळे मी राजकारणात या ठिकाणी पोहोचले असेही हर्षाली चौधरी म्हणाल्या. पहिल्यांदा मी निवडून आली तेव्हा मी वयाने लहान होती. मात्र दुसऱ्यांदा आता मी निवडून आले आहे. त्यामुळे विकासाचे ध्येय घेऊन मी या ठिकाणी उभी आहे. माझा प्रेग्नेंसीचा प्रॉब्लेम झाला.. सहा महिन्याचे बाळ आज जगात नाही. त्यावेळेस माझी मनाची मन:स्थिती डगमगलेली होती. दोन महिन्यानंतर वडीलही मला सोडून गेले. हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा कठीण होता असेही हर्षाली चौधरी म्हणाल्या.

 सगळ्यांचे आभार

सगळ्या गोष्टी सुरू असताना माझ्या पती विजय चौधरी मला माझ्या जुन्या ठिकाणी म्हणजेच माझे बालपण जेथे गेले, त्या ठिकाणी मला घेऊन आले, पुन्हा संधी मिळाली. माझे पतीची देखील खूप मोठी साथ मला मिळाली आहे. दुसऱ्यांदा पक्षाने देखील माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी नगरसेवक झाले आणि माझ्या पक्षातील सर्वांनी मला आज महापौर बनवले आहे आणि माझ्यावर इतका विश्वास दाखवला आहे. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.