ती काळरात्र कशी होती, संग्राम जगताप यांनी सेकंद ना सेकंद सांगितला, अपघाताचा तो थरारक क्षण

अंधारात एसटी चालकाला हे बॅरिकेटिंग लक्षात येण्यास उशीर झाल्यामुळे त्याने अचानक बस उजव्या लेनमध्ये वळवली. त्यामुळे आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारला बसची जोरदार धडक बसली.

ती काळरात्र कशी होती, संग्राम जगताप यांनी सेकंद ना सेकंद सांगितला, अपघाताचा तो थरारक क्षण
आमदार जगताप अपघातातून बचावलेImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 2:01 PM

अहमदनगर : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या कारला मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या अलिशान कारचा अक्षरशः चेंदामेंदा (Car Accident) झाला, मात्र सुदैवाने गाडीतील सर्व एअरबॅग्ज वेळीच उघडल्यामुळे आमदार जगताप यांच्यासह गाडीतून प्रवास करणाऱ्या पाचही जणांचा जीव थोडक्यात बचावला. ती काळरात्र कशी होती, याची सेकंद न सेकंद माहिती संग्राम जगताप यांनी सांगितली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) प्रवास करताना एसटी चालकाने अचानक गाडी उजवीकडे घेतल्यामुळे बसची धडक जगतापांच्या कारला बसली होती.

नेमकं काय घडलं?

आमदार संग्राम जगताप आज पहाटेच्या सुमारास मंत्रालयातील कामासाठी नगरहून मुंबईला निघाले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रसायनी गावाजवळ रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यासाठी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. पहाटे चार वाजता एक एसटी बस निघाली होती. मात्र अंधारात एसटी चालकाला हे बॅरिकेटिंग लक्षात येण्यास उशीर झाल्यामुळे त्याने अचानक बस उजव्या लेनमध्ये वळवली. त्यामुळे आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारला बसची जोरदार धडक बसली.

हे सुद्धा वाचा

एअर बॅग्जमुळे पाचही जण बचावले

बसची धडक इतकी जबरदस्त होती की, आमदार जगताप यांच्या आलिशान कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. मात्र अपघात होताच वाहनातील एअर बॅग उघडल्याने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताच्या वेळी वाहनात आमदार संग्राम जगताप, अनुप काळे, चालक आणि मुंबईतील दोन स्वीय सहाय्यक असे पाच जण होते

ही घटना घडताच आमदार जगताप यांनी कुटुंबाला फोन करुन अपघाताची माहिती दिली आणि काळजी न करण्यास सांगितलं. जगताप यांनी समर्थकांनाही चिंता न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर संग्राम जगताप सुखरुप मुंबईलाही पोहोचले.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.