AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत घडामोडींना वेग, अमित शाहांची शिंदे, फडणवीस, पवारांसोबत बंद दाराआड चर्चा, बैठकीत काय ठरलं?

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. या चार नेत्यांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली.

महायुतीत घडामोडींना वेग, अमित शाहांची शिंदे, फडणवीस, पवारांसोबत बंद दाराआड चर्चा, बैठकीत काय ठरलं?
| Updated on: Nov 10, 2024 | 3:29 PM
Share

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला वेग आला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. या संकल्प पत्रात पुढील पाच वर्षेंमध्ये काय काय योजना राबवणार याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे. दरम्यान या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड एक बैठक झाली आहे. चौघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

बैठकीत नेमकी कशावर चर्चा?  

प्रचाराच्या धामधुमीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बंददाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. या चार नेत्यांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये  अमित शाहांकडून महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेण्यात आला. विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, शेवटच्या टप्प्यात प्रचारावर भर द्या, अशा सूचना अमित शाहांकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपचा जाहीरनामा  

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं आहे. या संकल्पपत्रामध्ये पक्षाकडून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांनाऐवजी 2100 रुपये देणार, शेतकऱ्यांना कर्ज माफी, अंगणवाडी सेविकांच्या माणधनात वाढ, महिलांना आर्थिक साक्षर करू, महिलांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार, महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात 25 हजार महिला पोलिसांची भरती करणार अशा विविध घोषणा भाजपकडून आपल्या संकल्पपत्रात करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये अमित शाह यांनी विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, शेवटच्या टप्प्यात प्रचारावर भर द्या, अशा सूचना  केल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा