छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज पक्ष राज्यात किती जागा लढवणार? संभाजी राजे म्हणाले…

sambhaji raje swarajya party: स्वराज पक्षाची १७ तारखेला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत २८८ जागा लढवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. आमचा आत्मविश्वास २८८ जागा लढवण्याबाबत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज पक्ष राज्यात किती जागा लढवणार? संभाजी राजे म्हणाले...
sambhaji raje
| Updated on: Oct 16, 2024 | 12:00 PM

sambhaji raje swarajya party: राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महायुती, महाविकास आघाडीसह इतर पक्षही मैदानात उतरणार आहे. यंदा इतर पक्षही या मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे यांचा मनसे स्वबळावर निवडणूक मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी मनोज जरांगे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली आहे. हा पक्षही निवडणूक लढवणार आहे. किती जागांवर निवडणूक लढवणार त्याची माहिती नाशिकमध्ये संभाजी राजे यांनी नाशिकमध्ये बुधवारी दिली.

काय म्हणाले संभाजी राजे

स्वराज पक्षाची १७ तारखेला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत २८८ जागा लढवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. आमचा आत्मविश्वास २८८ जागा लढवण्याबाबत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साम, दाम, दंड, भेद सर्व वापरून निवडणूक लढवणार आहे. आमचे जागा वाटपाचे चित्र ७-८ दिवसांत स्पष्ट होईल. आम्ही चांगला उमेदवार असला तर तिकीट देऊ, असे संभाजी राजे यांनी म्हटले.

मनोज जरांगेबाबत म्हणाले…

नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा स्वराज्य पक्ष लढवणार आहे. येत्या ४-५ दिवसांत आमचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित होईल. आपण एकत्र येऊ, एकत्र आल्याशिवाय आपल्याला जे साध्य करायचंय ते साध्य करता येणार नाही. उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे संभाजी राजे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. जरांगे पाटील यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली आहे. ते आमच्या बरोबर येतील, हा मला विश्वास आहे, असे संभाजी राजे यांनी म्हटले.

मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्रात ताकद आहे. ते कुणाच्या सांगण्यावरून काही करतील, असं वाटत नाही. ते समाजाचा अंदाज घेत असतील म्हणून त्यांना वेळ लागेल, असे संभाजीराजे यांनी म्हटले. मला निर्णय घ्यायचा असेल तर मी मनोज जरांगे पाटील यांना विचारेल. त्यात मला कमीपणा वाटत नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले. तसेत प्रकाश आंबेडकर यांच्यावर मी भाष्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले.