AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझा जीव गेला तरी चालेल, पण…’, मराठा-OBC आरक्षणावर विजय वडेट्टीवार यांची स्पष्ट भूमिका

Maratha Reservation : मराठा-OBC आरक्षणावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. जालन्यात लाठीचार्ज झाल्यानंतर हे प्रकरण तापलं आहे.

'माझा जीव गेला तरी चालेल, पण...', मराठा-OBC आरक्षणावर विजय वडेट्टीवार यांची स्पष्ट भूमिका
Vijay Wadettiwar
| Edited By: | Updated on: Sep 05, 2023 | 11:38 AM
Share

नागपूर : “एसपी म्हणजे सरकार. अधिकारी आदेश देतो, म्हणजे जबाबदारी सरकारची असते. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली, त्याचा मला आनंद असून उपयोग नाही. पण मराठा समाजाला काय वाटतं, ते महत्त्वाच आहे. हे पुरस्कृत होतं, हे सिद्ध झालं” असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. “मनोज जरांगे पाटील मागच्या 12-13 दिवसापासून आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. एक माणूस समाजासाठी लढतोय, त्याची काळजी घेणं ही शासन, सर्वांची जबाबदारी आहे” असं विजय वडेट्टीवार म्हणाले. “यावर तोडगा काय काढायचा? तो फॉर्म्युला आम्ही सांगितलाय. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, अधिकच वाढवून द्या. राज्यात आणि केंद्रात बहुमतातल सरकार आहे. एका झटक्यात काम होऊ शकतं. ही फिरवाफिरवी कशाला? तुम्हाला महिना कशाला पाहिजे?” असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.

“आरक्षण एक वेगळा विषय आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. भले, माझा जीव गेला तरी चालेल. गैरसमज पसरवू नका. मराठा-ओबीसीमध्ये भांडण लावण्याच काम करु नये. सरकार एक भूमिका मांडत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वेगळं बोलतात. हा काय चाललय?. लोकांना फसवण्याच काम चालू आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करता का? दोन समाजात भांडण लावायची काम करता का? मराठा समाज काय समजायच ते समजेल” असं वडेट्टीवार म्हणाले. “मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच नुकसान होऊ नये, म्हणून माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे” असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. माझ्या शब्दात कुठलीही फिरवाफिरवी नाही, असं त्यांनी सांगितलं.

’30 दिवस नाही, 30 महिने घेतले तरी शक्य नाही’

“मराठा समाजाला कुणबी समाजाच प्रमाणपत्र देणार असाल, तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार का? हा प्रश्न विचारला जाणार. ओबीसीतून आरक्षण देणार असाल, तर ते वाढवून द्या” अशी आमची भूमिका आहे असं वडेट्टीवार म्हणाले. एकदिवसात आरक्षण शक्य नाही, 30 दिवस लागणार असं सरकारडून सांगितल जातय. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “30 दिवस नाही, 30 महिने घेतले तरी शक्य नाही. ही शुद्ध धूळफेक आहे. लाठीचार्ज मुळे जो असंतोष निर्माण झालाय, तो शातं करण्यासाठी हे सर्व सुरु आहे”

Follow Us
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'