AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambajogai Oxygen Shortage | धक्कादायक ! नाशिकनंतर आता अंबाजोगाईमध्ये ऑक्सिजनचा अभाव, 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप

अंबाजोगाई येथेसुद्धा ऑक्सिजनअभावी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Ambajogai Corona virus shortage of Oxygen)

Ambajogai Oxygen Shortage | धक्कादायक ! नाशिकनंतर आता अंबाजोगाईमध्ये ऑक्सिजनचा अभाव, 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप
Oxygen Shortage
| Updated on: Apr 21, 2021 | 5:52 PM
Share

बीड : नाशिक येथे ऑक्सिजन अभावी तब्बल 22 जणांचा दु्र्दैवी मृत्यू झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथेसुद्धा ऑक्सिजनअभावी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसा आरोप मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी केला आहे. याबाबत विचारले असता रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे (Ambajogai Oxygen Shortage) झाला नसल्याचे रुग्णालयाचे डीन शिवाजी शुक्रे यांनी सांगितलं आहे. (Maharashtra Beed Ambajogai five Corona virus infected patient died due to lack of Oxygen)

ऑक्सिजनअभावी 5 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप

राज्यात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. रोज हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातवरण आहे. आज ऑक्सिजन अभावी नाशिकमध्ये तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्य सुन्न झालेलं असताना आता अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिनच्या तुटवड्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहेत.

रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही- डॉ.शिवाजी सुक्रे

नाशिकची धटना ताजी असताना अंबाजोगाई येथेसुद्धा रुग्णांचा  मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचे आरोप झाल्यानंंतर पुन्हा मोठी खळबळ उडाली. ऑक्सिजन कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने आधीच खबरदारी का घेतली नाही, असे आरोप होऊ लागले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी याबाबत अधिकचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी सध्या आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

शारीरिक व्याधी असलेल्यांचाच मृत्यू

यावेळी पुढे स्पष्टीकरण देताना त्यांनी  दिवसभरात उपचार करताना एकूण 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच, आज मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांचे वय हे 60 वर्षे आहे. यामध्ये बहुतांश रुग्ण हे शारीरिक व्याधी किंवा रक्तदाब, हायपरटेन्शन असलेले रुग्ण आहेत, असंसुद्धा त्यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज (21 एप्रिल) दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, नाशिकची घटना ताजी असताना अंबाजोगाई येथेसुद्धा ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णांचे वाढते प्रमाण आणि ऑक्सिजनचा भासणारा तुटवडा हा चिंताजनक असल्याचं म्हटलं जातंय.

इतर बातम्याा :

Nashik Oxygen Leak : नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न!,मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू

Nashik Oxygen Leak LIVE Updates: आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं- राज ठाकरे

(Maharashtra Beed Ambajogai five Corona virus infected patient died due to lack of Oxygen)

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा