AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board Result Date 2022: ठरलं! उद्या लागणार बारावीचा निकाल…

बारावी, महाराष्ट्र बोर्ड बारावी रिझल्ट, वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री, अधिकृत वेबसाईट, HSC, 12th, Examination Results, Mahrashtra board, Education Maharashtra, HSC Results 2022

Maharashtra Board Result Date 2022: ठरलं! उद्या लागणार बारावीचा निकाल...
उद्या लागणार बारावीचा निकाल...Image Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 07, 2022 | 6:52 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र बारावीचा निकाल (Maharashtra HSC Results 2022) उद्या लागणार आहे! जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार अशी माहिती मागच्याच आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकवर्ग सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून होतं. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल अगदी वेळेत लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता निकाल लागणार.हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे. लवकरात लवकर या वेबसाईटला भेट द्या आणि आपला रिझल्ट चेक करा.

अनेक अडचणीनंतर राज्यात महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं. परीक्षा घेऊन झाल्या आणि एक नवीन अडचण समोर उभी राहिली. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पेपर चेकिंगवर बहिष्कार टाकला आणि बारावीचा रिझल्ट कसा लागणार आणि कधी लागणार असा प्रश्न सगळ्यांना पडला. खरं तर यासगळ्या प्रकारामुळे बारावीचा रिझल्ट उशिराच लागणार असं सगळ्यांना वाटू लागलं.

पण अखेर आज प्रतीक्षा संपलेली आहे. बारावीचा रिझल्ट दणक्यात आणि सांगितलेल्या वेळेत जाहीर करण्यात आलेला आहे. हा रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकतो. उद्या 8 जून 2022 रोजी बारावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहता येऊ शकणाआहे. चला तर हा निकाल कसा पाहायचा, त्याची सोपी पद्धत लगेचच समजून घेऊयात..

  1. जेव्हा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीच्या निकालाची घोषणा करेल, तेव्हा tv9 मराठीच्या वेबसाईटला भेट द्या.
  2. करिअर (टीव्ही9 मराठी करिअर) विभागात महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा
  3. होम पेजवर महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करुनही तुम्ही थेट निकाल पाहू शकाल.
  4. आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
  5. यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल.

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी