महत्त्वाची बातमी! आज दहावीचा निकाल, इथे पहा तुमचा रिझल्ट, या वेबसाईट्स लगेच करा नोट

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

महत्त्वाची बातमी! आज दहावीचा निकाल, इथे पहा तुमचा रिझल्ट, या वेबसाईट्स लगेच करा नोट
Exam Result
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: May 08, 2026 | 8:15 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी -मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, 8  आठ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत मंडळाच्यावतीने प्रसिद्धी पत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल हा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज (8 मे)  रोजी उपलब्ध होणार आहे. हा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवरून आपल्या गुणपत्रिकेची प्रीट काढण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी निकाल पहाण्यासाठी या संकेत स्थळांना भेट द्यावी

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

https://sscresult.mkcl.org

https://results.navneet.com

वरील संकेत स्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पहाता येणार आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार उद्या दुपारी एक वाजता सर्व विभागीय मंडळाचा निकाल एकाचवेळी जाहीर होणार आहे. परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी या संकेतस्थळांना भेट देऊन आपला निकाल पाहू शकतात. तसेच प्रिट काढण्याची सोय देखील या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रति पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय देखील उपलब्द करून देण्यात आली आहे, अशी माहिती बोर्डाच्या वतीने देण्यात आली आहे.

इथे चेक करा तुमचा निकाल

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us