AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉम्ब स्फोटाच्या तीन धमक्यांनी महाराष्ट्र हादरला… महापालिका ते आरएसएस मुख्यालय… पोलिसांची धावाधाव, काय काय घडलं?

Bomb Threat : पुणे महापालिका, विधान भवन, आरएसएसच्या मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे आता सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

बॉम्ब स्फोटाच्या तीन धमक्यांनी महाराष्ट्र हादरला... महापालिका ते आरएसएस मुख्यालय... पोलिसांची धावाधाव, काय काय घडलं?
Pune Mahapakila bomb threatImage Credit source: Google
| Updated on: Jun 10, 2026 | 3:27 PM
Share

राज्यात खळबळ उडवणारी बातमी आहे. पुणे महापालिका, विधान भवन, आरएसएसच्या मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका तसेच मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून संपूर्ण परिसराला कडेकोट सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

विधानभवन परिसरातील सुरक्षेत वाढ

धमकीची माहिती मिळताच श्वानपथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले. विधानभवनाच्या आत आणि बाहेर सखोल तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून श्वानपथकाच्या मदतीने प्रत्येक भागाची तपासणी केली जात आहे. प्रवेशद्वार, पार्किंग परिसर, कार्यालयीन विभाग तसेच सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणांची कसून झडती घेतली जात आहे. विधानभवन परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येत असून वाहनांचीही काटेकोर पडताळणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून कोणतीही जोखीम न पत्करता खबरदारीचे सर्व उपाय राबविण्यात येत आहेत.

पुणे महापालिकेला धमकी

आज महापौर कार्यालय, पुणे महानगरपालिका येथे बॉम्ब ठेवल्याबाबत धमकीचा ई-मेल आला होता. हा ईमेल कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सकाळी 10:15 वाजता पाहिला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पुणे महानगरपालिका, नवीन इमारत, महापौर कार्यालय येथे तात्काळ बंदोबस्त लावण्यात आला. BDDS पथकाने महापौर कार्यालय व पुणे महानगरपालिकेच्या संपूर्ण इमारतीची सखोल तपासणी केली. सदर तपासणीमध्ये बॉम्ब सदृश्य किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. प्राप्त ई-मेलचा स्रोत व IP Address शोधण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन मार्फत तांत्रिक तपास करण्यात आला, ही अफवा असल्याचे समोर आले आहे.

संघाचे मुख्यालय उडवण्याचाही मेलमध्ये उल्लेख

पुणे महापालिकेला उडवून देण्याचा जो मेल आला होता त्यात संघ मुख्यालयचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे संघ मुख्यालय, स्मृती भवन सह काही ठिकाणी चेकिंग करण्यात आली. त्यात काहीही आढळून आलं नाही. दररोज रुटीन चेकिंग सुरू असते मात्र आज मेल असल्याने अतिरिक्त चेकिंग करण्यात आली. संघ मुख्यलाय आणि परिसरात नियमीत सुरक्षा व्यवस्था लागलेली असते ते सकाळ संध्याकाळ चेकिंग करत असतात. मेलच्या अनुषंगाने सुद्धा चेकिंग करण्यात आली मात्र त्यात काहीही आढळून आलं नसल्याचं डीसीपी राहुल मदने यांनी सांगितलं आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर