AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचे तडकाफडकी 3 सर्वात मोठे निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत थेट शिक्कामोर्तब; लाखो विद्यार्थ्यांचे नशीब उजळले!

Maharashtra Cabinet Meeting Decisions Today : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचे एकूण तीन निर्णय घेण्यात आले. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सरकारचे तडकाफडकी 3 सर्वात मोठे निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत थेट शिक्कामोर्तब; लाखो विद्यार्थ्यांचे नशीब उजळले!
devendra fadnavis and maharashtra cabinet meeting decisions todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 05, 2026 | 2:44 PM
Share

Cabinet Meeting Decisions Today : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (5 मे 2026) मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सोबतच राज्यात राज्यातील शिक्षण, विद्यार्थी यांच्या हिताचे काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आदिवासी विकास विभागाअंतर्गत एक तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत दोन निर्णय घेण्यात आहेत. या निर्णयांमुळे आदिवासी मुलांच्या शिक्षणप्रगतीत मोठी मदत होणार आहे. तसेच धाराशीव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाचे अभियांत्रिकीचे शिक्षण अधिक सुलभ पद्धतीने मिळणार आहे.

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

आदिवासी विकास विभाग

आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी. डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय. महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी.

बैठकीला इतर खात्याचे मंत्री उपस्थित

दरम्यान, या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री तसेच वेगवेगळ्या विभागाचे मंत्री उपस्थित होते. लवकरच या निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे या वर्षाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या निर्णयांचा फायदा होणार आहे.

Follow Us
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं