Devendra Fadnavis : आळंदीतील कत्तल खान्याच्या आरक्षणाबद्दल आणि शेतकरी कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?
Devendra Fadnavis : पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला पण विभागांची अवस्था फार चांगली नाही, प्राध्यापकाची कमतरता आहे, याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं लक्ष वेधलं. "पहिल्यांदा मी पुणे विद्यापीठाच मनापासून अभिनंदन करतो. जगातल्या पहिल्या 600 विद्यापीठात आज पुणे विद्यापीठ आहे. मला अपेक्षा आहे की, पुढच्यावर्षी किंवा दोन वर्षात पहिल्या 500 विद्यापीठात आपली विद्यापीठं असतील"

आळंदीत आज माध्यम प्रतिनिधींना विश्वस्तांनी खूप खराब वागणूक दिली. हाकलण्याचा प्रयत्न झाला. त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. “पुन्हा अशा गोष्टी घडणार नाही, याची काळजी घेऊ. अनेकवेळा स्ट्रेस, टेन्शनमध्ये अशा गोष्टी घडतात. पण त्या पुन्हा घडू नयेत असा प्रयत्न आम्ही करु” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशा संस्थांमध्ये माणसं नेमताना काही निकष असतात, व्हिडिओ व्हायरल होतायत, तुम्हालाही वाईट वाटेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘या नेमणूका सरकार करत नाही. ज्यूडिशियल ऑफिसरच्या माध्यमातून या नेमणूका होतात’
आळंदीत कत्तलखान्याच्या आरक्षणाच्या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. “आळंदीचा जो विकास आराखडा आहे, त्या विकास आराखड्यात आळंदीत एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही. मी स्वत: कत्तलखान्याचे आरक्षण वगळण्याचे आदेश दिले आहेत. वारकरी संप्रदाय, वारकरी नेत्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करु इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलाखाना करु दिला जाणार नाही” असं मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर काय उत्तर?
सध्या धरणं लवकर भरतायत. सांगली-कोल्हापूरला फटका बसतोय, सरकराच नियोजन काय आहे? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही परिस्थितीकडे लक्ष ठेऊन आहोत. विसर्ग कधी सुरु करायचा, कधी बंद करायचा याचं नियोजन करण्यात आलं आहे. बाजूच्या राज्यांशी समन्वय ठेवण्यात येत आहे. त्या राज्यांमध्ये आपला एक इंजिनिअर बसलेला आहे. पावसाळ्यात तो तिथेच असतो. त्याच्या माध्यमातून समन्वय ठेऊन आहोत. अर्थात निसर्गाचा भरवसा देता येणार नाही. पण आपण आपल्या बाजूने नियोजन केलं आहे” त्याचवेळी शेतकरी कर्ज माफीच्या मुद्यावरही ते बोलले. “दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. योग्यवेळी सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ती क्षमता योगात आहे
“वारी ही महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. विठ्ठल दर्शनासाठी वारीला लाखो वारकरी पायी चालत जातात. ते सर्व वारकरी आज पुण्यात थांबले आहेत. आम्ही या कार्यक्रमाशी जोडून आज योगाभ्यास केला. पुण्यातील महाविद्यालय यात सहभागी झाली होती. भव्य कार्यक्रम झाला. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. प्राचीन संस्कृती, जीवन पद्धती, चिकित्सा पद्धती, ज्यात फक्त शरीराचा विचार केलेला नाही, मनाचाही विचार केला आहे. ती क्षमता योगात आहे. आज मोदीजींमुळे योगासनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलय”
पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला पण अवस्था खराब
पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला पण विभागांची अवस्था फार चांगली नाही, प्राध्यापकाची कमतरता आहे, याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं लक्ष वेधलं. “पहिल्यांदा मी पुणे विद्यापीठाच मनापासून अभिनंदन करतो. जगातल्या पहिल्या 600 विद्यापीठात आज पुणे विद्यापीठ आहे. मला अपेक्षा आहे की, पुढच्यावर्षी किंवा दोन वर्षात पहिल्या 500 विद्यापीठात आपली विद्यापीठं असतील. जगातल्या पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो. त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल सुरु आहे. इथले कुलगुरु, व्यवस्थापन परिषद, सिनेटर, प्राध्यापकांच मनापासून अभिनंदन करतो. जे तुम्ही डेफिसिट सांगितल, त्या बद्दल उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रकारच्या मान्यता दिल्या आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
