Devendra Fadnavis : ‘हे सरकार ज्या वेळेस पाचवर्ष पूर्ण करेल, त्यावेळी तुम्हाला …’ मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : "आपल दूरगामी विचार करतोय. लॉन्ग टर्म विजन या ठिकाणी माडंलेलं आहे. शेती क्षेत्रात विदर्भात मोदी सरकारकडून बळीराजा योजना आणली. जवळपास 20 वर्ष विदर्भातील 89 प्रकल्प अर्धवट होते. बळीराजा योजनेमुळे सिंचनाचे प्रकल्प पूर्णत्वास आणलेत. यासोबतच मोठे प्रकल्प गोसीखुर्द प्रकल्पाचं काम अत्यंत वेगाने आपण केलं. मधली अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार नसतं, तर अनेक प्रोजक्ट पूर्ण झाले असते" असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : हे सरकार ज्या वेळेस पाचवर्ष पूर्ण करेल, त्यावेळी तुम्हाला ... मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
| Updated on: Jul 28, 2025 | 1:28 PM

“विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी अतिशय मेहनत करुन विदर्भात अभूतपूर्व निकाल प्राप्त केला. पुन्हा एकदा विदर्भ भाजप, महायुतीच्या पाठिशी आहे हे दाखवून दिलं. काही जागा आपण अतिशय कमी मतांनी हरलो. अन्यथा यावेळी नवीन रेकॉर्ड विदर्भात तयार करु शकलो असतो. एकूणच महाराष्ट्रात आपण बघितलं की, सगळे रेकॉर्ड 2024 विधानसभा निवडणुकीत तोडले. याआधी सर्वाधिक हायेस्ट स्कोर 2014 विधानसभेत होता. त्यावेळी स्वबळावर आपण 122 जागा जिंकलेलो. यावेळी भाजपने कमाल केलीय, 132 आणि पाच 137 जागा भाजपच्या नेतृत्वात जिंकलो आहोत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजनासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.

“गेल्या 40 वर्षात महाराष्ट्रात कुठल्या एकापक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत. हा 30-35 वर्षांचा रेकॉर्ड आपण मोडला. कानाकोपऱ्यात भाजप विजयी झाली. अर्थातच 232 जागा महायुतीला मिळणं हा नवीन रेकॉर्ड झाला. याआधीचा रेकॉर्ड 222 जागाचा होता, तो ही रेकॉर्ड आपण मोडला” असं मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

‘त्यावेळी अपेक्षा देखील तशाच असतात’

“जनतेने अतिशय भरभरुन विजय विधानसभा निवडणुकीत दिला. आता आपल्या सरकारने कामाची सुरुवात केलीय. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पाच वर्षात महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहेत. जेव्हा लोक भरभरुन देतात, त्यावेळी अपेक्षा देखील तशाच असतात” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोठ्या प्रमाणात काम सुरु केलय

“देशात मोदीजींच सरकार आपल्या पाठिशी आहे. महायुती सरकाराला मिळालेल्या भक्कम पाठिंब्याने आपला आत्मविश्वास वाढवला आहे. हे सरकार ज्या वेळेस पाचवर्ष पूर्ण करेल, त्यावेळी महाराष्ट्राच पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालेलं पहायला मिळेल. महाराष्ट्र हा देशातलं उत्तम राज्य आहेच, पण महाराष्ट्रातल्या दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला सर्वांच्या जीवनात आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु केलय” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

काम करण्यामागे काय दृष्टी?

“हे केवळ कागदावरचे कार्यक्रम नाहीत. सरकारला संस्थात्मक बळकटी देण्याचा प्रयत्न करतोय. एखादा अधिकारी चांगला काम करतो, एखादा अधिकारी वाईट करतो, एखाद्या जिल्ह्यात चांगलं काम होतं, एखाद्या जिल्ह्यात खराब काम होतं. असं न होता इन्स्टिट्यूट मिशनरी बिल्ट करायची आहे. ज्यातून सरकारच्या योजना सर्वभागात योग्य पद्धतीने सर्व माणसांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्या दुष्टीने काम सुरु केलय” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.