
पुणे स्वारगेट एसटी डेपोत एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला आज मध्यरात्री अटक झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज बोलले. “आरोपीला अटक झाली आहे. तो लपून बसला होता. त्याला पोलिसांनी वेगवेगळ्या टेक्नोलॉजीचा वापर करुन शोधून काढलं. लवकरया या घटनेचा पदार्फाश होईल. त्या संदर्भात पोलीस कमिशनरनी काही माहिती दिली. या स्टेजला जास्त माहिती देणं योग्य नाही. योग्य स्टेज आल्यावर आपल्याला नेमका घटनाक्रम काय आहे? त्याची सगळी माहिती देऊ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आरोपीने तीनवेळी आत्महत्येचा प्रयत्न केला असं पत्रकारांनी विचारलं, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आत्ताच यावर बोलणं घाईच ठरेल. आज आरोपीची पोलिसांना कस्टडी मिळेल. त्यानंतर तपास होईल. काही टेक्निकल, फॉरेन्सक डिटेल आल्यानंतर या संदर्भात बोलणं योग्य होईल” मंत्र्यांकडून या बद्दल आक्षेपार्ह विधान होतायत. संजय सावकारे म्हणाले की, हे पुण्यात नाही देशात अशा घटना घडतात. योगेश कदम म्हणाले की, तरुणीने प्रतिकार केला नाही म्हणून हे घडलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
‘ते नवीन आहेत, तरुण मंत्री आहेत’
“योगेश कदम जे बोलले ते वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, माझा स्वत:चा समज असा आहे की, ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, की हा गर्दीचा भाग आहे. बस आत नव्हती, बाहेर होती. पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आलं नाही, असं त्यांचा सांगण्याचा प्रयत्न होता. तथापी ते नवीन आहेत, तरुण मंत्री आहेत. काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की, मी त्यांना सल्ला देईन की, अशा प्रकरणात बोलताना जास्त संवेदनशील असंल पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली, तर समाज मनावर वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. मंत्री, लोकप्रतिनिधींनी अशा घटनांबद्दल बोलताना संवेदनशी असलं पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शक्ती कायद्यामध्ये फडणवीस काय म्हणाले?
शक्ती कायदा बनवला होता पण राष्ट्रपतींनी तो सहीशिवाय पाठवला यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शक्ती कायदा जो तयार केला होता, तो कायदा अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता. केंद्रीय गृह विभागाने जो आक्षेप घेतला होता, त्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयावर अधिक्षेप होत होता. हा अधिकार राज्याला नाही. म्हणून काही बदल करणं अपेक्षित होते. पण त्याआधी केंद्र सरकारने काही नवीन कायदे केले. आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या, त्या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा त्याचा आढावा घेऊ आणि नवीन दुरुस्तीसह पुढची कारवाई करु”