MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC च्या विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं होतं. त्यांनी शब्द दिलेला तो पाळला. MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC च्या विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं होतं. त्यांनी शब्द दिलेला तो पाळला. MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलीचं आश्वासन दिलं होतं. महेंद्र हरपाळकर यांच्यावर संभाजी ब्रिगेडने शाईफेक केली होती. तीन दिवसांपूर्वी एमपीएससीच्या विध्यार्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी सकारात्मक चर्चा पार पडलेली. एमपीएससीचे सचिव महेंद्र होरपाळकर यांची बदली होणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलं होतं. त्यानुसार हरपाळकरांची बदली झाली आहे.
मागच्या महिन्यात नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासलं होतं. MPSC चे अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी एमपीएससीच्या परीक्षार्थींची मागणी होती. कारण पेपर फुटीचं हे प्रकरण त्यांच्या कार्यकाळात घडलं आहे पेपर फुटीमध्ये MPSC मध्ये काम करणाऱ्या लोकांचा सहभाग असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अशा पद्धतीची लोकं MPSC वर नसवीत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
तोंडाला काळं फासून प्रश्न सुटत नाही
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्यापासून एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर उतरुन MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासण्याच्या या प्रकाराशी खासदार सुप्रिया सुळे यांनी असहमती व्यक्त केली होती. “हे करणं योग्य नाही. तोंडाला काळं फासून प्रश्न सुटत नाही” असं सुप्रिया सुळे म्हणालेल्या. “मतभेद असू शकतात. पण लोकशाहीत मतभेद असले पाहिजेत. पण तोंडाला काळं फासणं वैगेरे संस्कृती योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी यावर बैठक घेतली होती. हवं तर पुन्हा बैठक घेऊ” असं सुप्रिया सुळे म्हणालेल्या.
