AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update : रुग्णसंख्येत घट, चिंता मात्र कायम! दिवसभरात 58 हजार 924 नवे रुग्ण, 351 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात 58 हजार 924 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

Maharashtra Corona Update : रुग्णसंख्येत घट, चिंता मात्र कायम! दिवसभरात 58 हजार 924 नवे रुग्ण, 351 जणांचा मृत्यू
कोरोना चाचणी प्रातिनिधीक फोटो
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 19, 2021 | 8:24 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध अजून कडक करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. अशावेळी राज्यात आज दिवसभरात 58 हजार 924 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसभरात 52 हजार 412 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कालपेक्षा आज राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास 10 हजारांनी कमी झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. राज्यात काल दिवसभरात तब्बल 68 हजार 631 रुग्ण आढळून आले होते. (Decrease in the number of corona patients in the state, 58 thousand 924 new patients in a day)

आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 38 लाख 98 हजार 262 वर पोहोचली आहे. त्यातील 31 लाख 59 हजार 240 जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 76 हजार 520 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईतही लॉकडाऊनचा परिणाम दिसून येत आहे. कारण दिवसेंदिवस वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा घटल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आज दिवसभरात 7 हजार 381 जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तर 8 हजार 583 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 86 हजार 622 रुग्ण आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहेत.

मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 83 टक्क्यांवर आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 47 दिवसांवर आलाय. मुंबईत सध्या 86 हजार 410 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 587 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 6 हजार 473 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात दिवसभरात 76 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 22 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 54 हजार 696 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 267 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

आजच्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 71 हजार 824 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 10 हजार 965 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर 6 हजार 163 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपुरातील कोरोना स्थितीही दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. मृत्यूचा आकडाही सातत्याने वाढत आहे. नागपुरात आज दिवसभरात 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 4 तासांत 7 हजार 374 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 हजार 97 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यूचं प्रमाण वाढत आहे.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी, 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार

Maharashtra Lockdown : किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु राहणार! गर्दी टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Decrease in the number of corona patients in the state, 58 thousand 924 new patients in a day

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?