AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election 2026 Date : राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा, मतदान कधी? निकाल कधी? वाचा A टू Z माहिती

आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये अखेर निवडणूक आयोगाकडून राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra Election 2026 Date :  राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा, मतदान कधी? निकाल कधी? वाचा A टू Z माहिती
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 15, 2025 | 5:39 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर आता निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.  दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमापत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे.  महापालिका निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.

दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून मताधिकार हे अॅप तयार करण्यात आलं आहे. ज्यांचं दुबार मतदान आहे, त्यांच्या नावापुढे डबल स्टार करण्यात आलं आहे, ज्यांचं नाव दुबार असेल त्यांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्यात येईल असंही यावेळी आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, तसेच मतदार यादितील दुरुस्तीचा अधिकार आयोगाला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या एकूण 29  महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 29  महापालिकेमधील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे. या महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30  डिसेंबर असा असणार आहे, तर  31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे, तर 15   जानेवारी 2026  रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026  रोजी मतमोजणी होणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखा

अर्ज स्वीकारणे  23 डिसेंबर ते 30 डिसेंबर, अर्जाची छाननी 31 डिसेंबर, उमेदवारी माघार घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026,  निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी, मतदान दिनांक 15 जानेवारी 2026,  मतमोजणी 16 जानेवारी 2026

दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होता, जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ दूर होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणीही करण्यात येत होती, मात्र आता राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता