Local Body Election : डबल स्टार म्हणजे काय? दुबार मतदारांचं काय होणार? निवडणुकीबाबत 5 प्रश्नांची 5 उत्तरं!

Local Body Election : नुकताच राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर डबल स्टार म्हणजे काय? दुबार मतदारांचं काय होणार? असे अनेक प्रश्न पडले आहेत. चला जाणून घेऊया निवडणुकीबाबतच्या 5 प्रश्नांची 5 उत्तरं...

Local Body Election : डबल स्टार म्हणजे काय? दुबार मतदारांचं काय होणार? निवडणुकीबाबत 5 प्रश्नांची 5 उत्तरं!
State Election
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Nov 04, 2025 | 5:52 PM

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख नुकताच निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकरीता 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत डबल स्टार, दुबार मतदार अशा काही गोष्टींचा उल्लेख केला. चला जाणून घेऊया निवडणुकीबाबतच्या 5 प्रश्नांची 5 उत्तरं…

डबल स्टार म्हणजे काय?

दुबार नावे होऊ नये म्हणून सिस्टिमवर टुल विकसित केलं आहे. प्रभागात संभाव्य दुबार मतदारांसमोर डबल स्टार आलं आहे. ज्याच्या नावापुढे स्टार आला आहे तो कोणत्या प्रभागात आणि कुठे मतदान करेल याची माहिती संबंधित अधिकारी पाहिल. त्याचं नाव आणि लिंग वगैरे पाहिले जाईल. ज्या मतदान केंद्रात ऑप्शन दिलं तिथे मतदान करता येईल. पण इतर ठिकाणी करता येणार नाही. दुबार मतदारासमोर डबल स्टार आलं आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही तर त्या मतदाराकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल. कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं लिहून घेतलं जाईल. या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घेतलं जाईल असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

दुबार मतदारांचं काय होणार?

दुबार तिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत. निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. दुबार तिबार मतदारांबाबत कारवाई करता येते. क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदारयादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो. आम्ही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करत आहोत. दुबार तिबार मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. मतदार यादी जितकी स्वच्छ करता येईल तितकं आम्ही करतो. एका घरात अनेक मतदार दाखवले आहेत, त्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी भाष्य केलं आहे.

मतदरांसाठी कोणते नवीन मोबाईल अॅप?

मतदारांना मतदान यादीत नाव शोधणे सोपे व्हावे म्हणून मोबाईल अॅप डेवलप करण्यात आलवे आहे. या मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना आपल्या नावाबरोबरच आपले मतदाने केंद्रही शोधता येणार आहे.

मतदारांसाठी संकेतस्थळ

https://mahasecvoterlist.in या संकेत स्थळावर जावे लागणार. त्यानंतर मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नाव शोधता येणार आहे. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करुन मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल.

पालिका निवडणुका कधी?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीच्या अगोदर राज्यातील सर्व महापालिकांसाठी निवडणूक घेतली जाईल, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. यात मुंबई, ठाणे महापालिकेचाही समावेश असेल. म्हणजेच 31 जानेवारीच्या अगोदर मुंबई आणि ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे.

FAQ :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न: मतदार यादीतील डबल स्टार मार्किंगबाबत महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

१. मतदार यादीत डबल स्टार मार्क काय दर्शवते?

डबल स्टार मार्क हे एका मतदारसंघातील संभाव्य दुबार मतदारांसाठी मतदार यादीत दिसते. हे एका सिस्टम टूलचा भाग आहे जे दुबार नावे टाळण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. सिंगल स्टार असलेल्या मतदारांची नावे आणि लिंग यांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते जेणेकरून ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करू शकतात हे निश्चित होईल. ते केवळ निर्दिष्ट केंद्रावरच मतदान करू शकतात; अन्यत्र मतदानाची परवानगी नाही.

२. डबल स्टार मार्क का वापरले जाते?

हे संभाव्य दुबार मतदार ओळखण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जाते जेणेकरून मतदार यादी स्वच्छ राहील आणि निवडणूक अनियमितता टाळता येतील. महाराष्ट्र निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी मिळते आणि ते लिपिकीय चूका दुरुस्त करतात, जसे की चुकीच्या मतदारसंघाची नियुक्ती किंवा विधानसभा मतदार यादीतून नावे गळती. उद्देश मतदार मतदान वाढवणे आणि दुबार मतदारांशी संपर्क साधून यादी स्वच्छ करणे हा आहे.

३. डबल स्टार असलेल्या मतदारांवर काय परिणाम होतो?

डबल स्टार असलेल्या मतदारांना केवळ त्यांच्या निर्दिष्ट मतदान केंद्रावर मतदान करण्यास मर्यादित केले जाते. जर ते प्रतिसाद देत नसतील, तर त्यांना एक घोषणापत्र घेतले जाते ज्यात नमूद केले जाते की त्यांनी कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केलेले नाही आणि अन्यत्र मतदान करणार नाहीत. आयोग दुबार मतदारांशी संपर्क साधण्यासाठी जागृती मोहिमा राबवत आहे आणि एकाच घरातील एकाधिक नोंदींसारख्या चुकांचे दुरुस्ती करत आहे.

४. मतदार यादीतील अनियमिततांबाबत कोणत्या वाद किंवा तक्रारी आहेत?

विरोधी पक्ष (MVA आणि MNS) यांनी मतदार यादीतील अनियमिततांबाबत चिंता व्यक्त केली असून, निवडणूक आयोगाला चार पानांचे पत्र देऊन हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. भाजप नेते अमित सातम यांनी ‘वोट जिहाद’ आणि दुबार मुस्लिम मतदारांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. एकनाथ खडसे यांनी मतदार यादीच्या समस्या असल्याने निवडणूक आयोगावर दबाव असल्याचा आरोप केला आहे. अतुल लोंढे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त मतदार यादीच्या चिंता दुर्लक्षित करत असल्याचे सांगितले असून, निष्पक्ष निवडणुकीवर शंका उपस्थित केली आहे.

५. मतदारांना त्यांची स्थिती तपासणे किंवा दुरुस्त करण्यासाठी कोणते पाऊल उचलावे?

मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर https://mahasecvoterlist.in वेबसाइटवर जाऊन नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांकाने शोध घेऊ शकतात. ‘Search Name in Voter List’ पर्याय वापरावा. नाव आणि मतदान केंद्र शोधणे सोपे करण्यासाठी मोबाइल अॅप विकसित केले जात आहे.

६. निवडणूक आयोगाचे अधिकृत स्पष्टीकरण काय आहे?

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने सांगितले आहे की ते कोणत्याही दबावाखाली काम करत नाहीत आणि लिपिकीय चुकांचे दुरुस्ती करतात, जसे की चुकीचे मतदारसंघ किंवा गळती नावे. मुख्य निवडणूक आयुक्ताने एकाच घरातील एकाधिक मतदार नोंदींबाबत टिप्पणी केली आहे. आयोग मतदार यादी स्वच्छ करण्यावर आणि दुबार मतदारांशी संपर्क साधून मतदान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी. ४ नोव्हेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू. मुंबई आणि ठाण्यासह महानगरपालिका निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी होणार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. सर्व निवडणुका EVM द्वारे होणार, बॅलेट पेपर नाहीत.