AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनानंतर मुंबईत आणखी एक आंदोलन धडकणार, सरकारला फक्त 2 महिन्याचा अल्टिमेटम, मागणी काय?

२९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन होणार आहे, तर २८ ऑक्टोबर रोजी शेतकरी कर्जमाफीसाठी भव्य मेळावा आयोजित आहे. शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे.

मराठा आंदोलनानंतर मुंबईत आणखी एक आंदोलन धडकणार, सरकारला फक्त 2 महिन्याचा अल्टिमेटम, मागणी काय?
farmer
| Updated on: Aug 26, 2025 | 3:22 PM
Share

येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाने एल्गार पुकारत मुंबईत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लाखो शेतकरी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी येत्या 28 ऑक्टोबर रोजी मुंबईत एक भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनाची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव येथील आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फोडण्याचा प्रयत्न

आमदार कैलास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर दोन महिन्यांच्या आत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात येईल. या आंदोलनासाठी एक विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे. यानुसार, पुढील दोन महिन्यांत राज्यभरात विभागवार मेळावे घेतले जातील. ज्यातून या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल. या आंदोलनात राज्यातील विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. या मेळाव्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाईल.

येत्या 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुंबईतील भव्य मेळाव्यात राज्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनामागचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जातून पूर्णपणे मुक्त करणे हा आहे. ज्यामुळे त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल. मराठा आरक्षण आंदोलनाप्रमाणेच हे आंदोलनही सरकारसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते, असे मत राजकीय विश्लेषकांचे आहे.

मराठा आरक्षणासाठी भव्य आंदोलनाची हाक 

दरम्यान येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यासाठी हजारो मराठा आंदोलक आपल्या मागण्या घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला अल्टिमेटम दिलं. मी आजपासून काहीही बोलणार नाही. मी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय असे मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यासोबत मनोज जरांगेंनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असेही ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे मुंबईत येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाचे मोठे आंदोलन होणार आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा