AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेताच्या बांधावरुन मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : काही ठिकाणी पाणी अचानक सोडल्यामुळे नुकसान झालं, त्या प्रश्नानावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. "काही ठिकाणी पाऊस हा ढगफुटीसारखा कोसळला. त्यामुळे नेहमीसारखं रेग्युलेट करुन पाणी सोडणं शक्य नव्हतं"

Devendra Fadnavis : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेताच्या बांधावरुन मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 24, 2025 | 12:37 PM
Share

“काल आम्ही जवळपास 2 हजार कोटी रिलीज केले. शेतकऱ्यांना मदत करणारच आहोत, पण त्यासोबत ज्यांच्या घराचं नकुसान झालेलं आहे. अन्नधान्याच नुकसान झालय, त्यांनाही मदत करणार आहोत. शासनाने हा निर्णय केलेला आहे की, कुठलेही अधिकचे निकष न लावता आवश्यकतेनुसार निकष शिथिल करुन नागरिक केंद्रीत मदत करायची आहे. नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना, शेतकऱ्यांना, शेत मुजरांना मदत होईल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यामध्ये येऊन नुकसानीची पाहणी केली.

‘आपत्ती सुरु असताना पैसा रिलीज करणं सुरु केलेलंआहे. दिवाळीपूर्वी आम्ही सर्वांना मदत करणार आहोत’ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे, त्यावर फडणवीस म्हणाले की, “ओला दुष्काळ बोली भाषेतली टर्म आहे. पावसामुळे जे नुकसान झालय त्या सर्वाची नुकसानभरपाई, टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पहिल्यांदा तातडीची मदत

“पहिल्यांदा तातडीची मदत हा विषय महत्वाचा आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत. केंद्र सरकारही मदत करणार आहे. एनडीआरएफला काही एडवान्स पैसे दिलेले असतात. ते खर्च करण्यास सुरुवात केली आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. जो काही निधी लागेल, तो देण्याच आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नेहमीसारखं रेग्युलेट करुन पाणी सोडणं शक्य नव्हतं

काही ठिकाणी पाणी अचानक सोडल्यामुळे नुकसान झालं, त्या प्रश्नानावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. “काही ठिकाणी पाऊस हा ढगफुटीसारखा कोसळला. त्यामुळे नेहमीसारखं रेग्युलेट करुन पाणी सोडणं शक्य नव्हतं. या संदर्भात कोणी काही चूक केलीय का हे तपासू. पाऊस असा झाला की, रेग्युलेट फ्लो शक्य नव्हता. अनरेग्युलेटेड कॅचमेटमध्य ढगफुटीसारखा पाऊस झाला” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निर्सगाच चक्र बदलेलं आहे

“निर्सगाच चक्र बदलेलं आहे. वातावरण बदलाचा परिणाम या ठिकाणी होत आहे. आपण याकडे लक्ष देणं गरजेच आहे. खरडून गेलेल्या जमिनी संदर्भात काही नॉर्म्स आहेत. अधिकचे पैसे देणार आहोत. आता आपल्याला पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत करणं गरजेच आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.